पाकिस्तानात 8 वर्षीय हिंदू बालिकेवर सामूहिक बलात्कार ; डोळेही काढले.

पाकिस्तानात 8 वर्षीय हिंदू बालिकेवर सामूहिक बलात्कार ; डोळेही काढले.


एस.के.24 तास


नवी दिल्ली : पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत. आता सिंध प्रांतात एका आठ वर्षीय हिंदू मुलीसोबत क्रूरतेचे प्रकरण समोर आले आहे. मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर राक्षसांनी तिचे डोळे काढले. हैदराबादमधील सरकारी रुग्णालयात ही मुलगी आयुष्याशी लढत आहे.


एका हिंदू मानवाधिकार कार्यकर्त्याने या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये पीडितेला स्ट्रेचरवर बसवून तिचे आई-वडील हॉस्पिटलच्या आवारात घेऊन जात असताना दिसतात. हे प्रकरण सिंधमधील उमरकोट शहरातील आहे.


प्रकरणानुसार, पीडित मुलगी ही भिल्ल समाजाची आहे. 28 ऑगस्ट रोजी आरोपी तिला घेऊन गेले होते. सामूहिक बलात्कारापूर्वी आणि नंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. राक्षसांनी तिचा संपूर्ण चेहरा ओरबाडला आणि डोळेही उपटले.


मीडिया रिपोर्ट्सनुसार,

रक्तस्त्राव थांबत नसल्यामुळे मुलीची अवस्था अत्यंत बिकट आहे. तिच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले.


स्थानिक आपत्कालीन रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला बीआयडीएस रुग्णालयात पाठवले. शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपनुसार, पीडितेच्या आईने मीडियाला सांगितले की,मुलगी एका स्थानिक दुकानात गेली होती, परंतु ती परत आली नाही. व्हिडिओमध्ये महिला स्थानिक भाषेत बोलताना ऐकू येते. आरोपीने मुलीला मृत समजून सोडून दिले. पोलिसांना अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !