मॅजिक बस तर्फे प्रत्यक्ष मोबाईल EVM ने झाली शालेय मंत्रिमंडळ स्थापन ; त्यातून विद्यार्थ्यांना समजली खरी लोकशाही.

मॅजिक बस तर्फे प्रत्यक्ष मोबाईल EVM ने झाली शालेय मंत्रिमंडळ स्थापन ; त्यातून विद्यार्थ्यांना समजली खरी लोकशाही.


एस.के.24 तास


गडचिरोली : आज  दिनांक ७ जुलै २०२२ ला जि.प.उ.प्रा. शाळा आंबेशिवनी येथे मॅजिक बस चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे सर,तालुका निरीक्षक मा.देवेंद्र हिरापुरे सर व मुख्याध्यापक श्री सुरेश बांबोळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षक मा. सागर आत्राम सर,श्रीमती शेख मॅडम तसेच शाळेचे इतर शिक्षक व कर्मचारी यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना खरी लोकशाही समजावी म्हणून प्रत्यक्ष मोबाईल EVM च्या माध्यमातून शालेय बालपंचायत निवडणूक पार पडली. महत्वाचे म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक मा. बांबोळकर सर यांनी स्वतः विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावून सांगीतली आणि विद्यार्थ्यांना निवणूकीत भाग घेण्यास उस्फुर्त केले. 


मॅजिक बस तर्फे मागील वर्षीपासून शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेऊन त्यांना त्यांची जबाबदारी सांगून प्रत्यक्ष काम करीत आहे.प्रत्येक मुलांना जबाबदारी मिळावी व काही मुले बाहेर शिक्षणासाठी जात असतात म्हणुन दरवर्षी नव्याने निवडणूक घेतली जात असते.


                 यावेळी जिवन कौशल्य शिक्षक देवाजी बावणे,माजी मंत्रिमडळ तसेच शाळेतील इतर कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.


निवडणूक प्रक्रियेनंतर निकाल जाहीर करून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !