जीर्णावस्थेतील इमारतीची अवस्था असलेल्यांना घरकुल योजनेचा लाभ द्या ; भारतीय क्रांतिकारी संघटनेची मागणी.
एस.के.24 तास
नागभिड : नगर परिषद क्षेत्रातील बरेच वार्डातील इमारती कित्येक वर्षापासून जीर्ण झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर सतत मुसळधार पावसामुळे घराची अवस्था कोसळून पडल्यासारखी झाल्याने नगर परिषद प्रशासनाने घरकुल योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा अशी मागणी भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा यानीं केली.
नगर परिषदेचे 8/6/2022 ला वार्डातील बऱ्याच जिर्ण झालेल्या इमारत मालकांना पत्र पाठविण्यात आले ते म्हणजे असे कि जीर्णवस्थेतील इमारत अथवा इमारतीचा भाग पडल्यास संपूर्ण जबाबदारी आपली राहिल असे पत्र पाठवले. यावर टेरेन्स कोब्रा यानीं आक्षेप घेतला. कित्येक इमारती /घरे हि जीर्णवस्थेत असून त्याचा काही भाग पडण्याची शक्यता आहे याची माहिती नगर परिषदेला असतानां झोपल्याचे सोंग का घेऊन होती? तात्काळ वंचित लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत लाभ देण्याची कार्यवाही करण्याऐवजी आपली जबाबदारी नगर परिषद झटकून देताना दिसत आहे. या विरोधात आक्षेप घेऊन भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा यानीं निवेदन दिले.
नगर परिषद मध्ये असलेल्या सत्ताधारी व विरोधी गटानी अपेक्षित नागरिकांच्या हितार्थ वंचित लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यास अपयशी ठरली फक्त विकासाचे कांगावा करित फिरले असा आरोपही टेरेन्स कोब्रा यानी केला.
निवेदन देताना भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या महिला अध्यक्षा,आशा सोनटक्के,पाथोडे बाई व वार्डातील नागरिक उपस्थित होते.