मुल शहरात पावसाचा कहर,नागरिकाचे मोठे नुकसान झाले.

मुल शहरात पावसाचा कहर,नागरिकाचे मोठे नुकसान झाले.


एस.के.24 तास


 

मुल : तालुका क्रीडा संकुल या परिसरातून येणारा नाला काही ठिकाणी अडत असल्यामुळे आणि तलावाच्या खोली कारण व सौदरीकरनाचे काम सुरू आहे त्यातील निघालेली मातीचा ढिगारा तिथे टाकल्यामुळे पाणी प्रवाहाने तलावात जात नाही, त्याच्यामुळे पाण्याला दाब असते याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे.

सदर परिसराची शासन स्तरावरून चौकशी करून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त करून येथील वास्तव्यास असलेल्या नागरिकांना होणारा त्रास गांभीर्याने लक्ष घालून यावर त्वरित उपाय करावा अशी येथील जनतेची मागणी आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकाचे मोठे नुकसान झाले.मान्सूनचे (Monsoon) आगमन होऊन गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे.मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy To Heavy Rainfall) पडत आहे.  पावसाने  Rainfall) झोडपून काढले आहे.स्थानिक मूल मध्ये १ ते १/२ तासाच्या मुसळधार पावसाने शहराच्या वेगवेगळ्या भागात लोकांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले.वॉर्ड क्मांक १४ मध्ये c b c s convent school च्या पुढील रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी असल्याने लोकांना येण्या जाण्या साठी मोठी फजिती निर्माण झाली. पावसाची सुरुवात नेमकी विद्यार्थ्याची सकाळ पाळी संपून दुपार पाळीची शाळा सुरू होताना झाल्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही, तर बाहेर गावावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसेस मुले येता आले नाही. घरं पाण्याखाली जाऊन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. संसार उपयोगी वस्तू पाण्यासोबत वाहून गेल्या आहेत.पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !