मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबगाव च्या वतीने बालपंचायत गठीत.
एस.के.24 तास
मुल : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री.प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक कु.निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व मुल येथील शाळा मधील मूल तालुक्यात "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. याच कार्यक्रमाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबगाव येथे निवडणूक घेऊन बालपंचायत गठीत करण्यात आली आणि निवडून आलेल्या मुलांना लोकशाही निवडणूक पद्धती माहिती व्हावी आणि आपल्या गावाचे आणि देशाचे नेतृत्व करावे या उद्देशाने ही निवडणूक घेण्यात आली तसेच पदाधिकाऱ्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.