धान उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करीता आर्थिक मदत व बिजाई पुरवठा करावा – गोपाल रायपुरे,रिपाई महाराष्ट्र प्रदेश सचिव.
एस.के.24 तास
सावली : विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया हे चार जिल्हे सर्वाधिक धान उत्पादक जिल्हे आहेत. या चारही जिल्ह्याच्या अवतीभवती नद्या, नाल्यांचा मोठ्या प्रमाणत नैसर्गिक वास्तव्य आहे. एवढेच नाहीतर डोंगर दऱ्यानी जंगल व्याप्त जिल्हे आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शेतकरी राजा शेत जमिनीत बियाणे टाकून शेती पिकविण्याची धडपड करीत असता तर मागील १० दिवसापासून सततधार पावसाने हजेरी लावली आणि शेतात टाकलेले बियाणे पूर्णता नष्ट झाले. काही बियाणे अति पावसामुळे कुजले तर काही बियाणे उगवलेले वाढ झालीच नाही. ९० टक्के शेतकऱ्यांनी या वर्षाला बंधित धान शिंपडून आवत्या टाकला. परंतु अति पावसामुळे आवत्याचे स्वप्न चकनाचूर झाले. पऱ्हे कुजले, आवत्या सडल्या अशा स्थितीत शेतकऱ्यांना दुबार पेरणीची अडचण निर्माण झाली. मागील वर्षी ऐनवेळी धान कापणीच्या वेळेस पाऊस झाला आणि धान बियाणे पेरणीक्षम राहिले नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु यावर्षीच्या मागील १० दिवसाचे अतिपावसामुळे शेतात टाकलेले बियाणे कुजल्याने नष्ट झालेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शेती कशी करावी हि चिंता शेतकरी बांधवांना सतावत असून आर्थिक टंचाई मुळे शेती पळीत ठेवावी लागणार अशी भीती निर्माण झाली आहे. शेतकरी बांधवाच्या बियाणे बाबतची अडचण लक्षात घेता शासनांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बि – बियाणे खरेदी करण्याकरिता व पेरणी करीता आर्थिक मदत देऊन बियाणे पुरवठा करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश सचिव,गोपाल रायपुरे यांनी शासनाकडे केलेली आहे.