आम आदमी पार्टी च्या तर्फे मा,तहसीलदार,साहेब नागभीड यांच्या वतीने मा,मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन.

आम आदमी पार्टी च्या तर्फे मा,तहसीलदार,साहेब नागभीड यांच्या वतीने मा,मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन.


एस.के.24 तास


नागभीड : वाढीव वीज दर रद्द करणे , शिवसेनेच्या वचन नाम्याप्रमाणे 300 युनिट 30 % दर कमी करणे आणि 200 युनिट मोफत देण्याबाबत .


मोहदय , 

आपणास माहीतच आहे की महावितरण कडून लॉकडाऊन च्या काळात 1 एप्रिल 2020 पासून 20 % वीज दरवाढ करण्यात होती . त्यामुळे देशात महागडी वीज राज्यात आहे . तरीही आता आपले सरकार आल्याबरोबर आपणही 20 % पर्यंत भाव वाढ केली आहे . शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही 300 युनिट घरगुती वापरात 30 % स्वस्त वीज देऊ . तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात 100 ते 200 युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे . एवढेच नव्हे तर महाआघाडी सरकार असताना मागच्या दोन वर्षात बीजेपी व मा . देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ कमी करणे व मोफत वीज देण्याबाबत  अनेक वेळा रस्त्यावर येऊन आंदोलन केलेत . दिल्ली मध्ये मा . अरविंद केजरीवाल सरकार मागच्या 8 वर्षांपासून 200 युनिट वीज मोफत आणि जास्त वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करत आहे , तरीही दिल्ली सरकार चे वीज खाते नफ्यात आहे . तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब मधील श्री भगवंत मान सरकार ने सुद्धा 1 जुलै 2022 पासून 300 युनिट वीज मोफत केली आहे . आपल्या राज्यात 2.50 ते 3 रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज 12 ते 18 रुपये प्रती युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लूट होत आहे . ही सावकारी लूट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेऊन राज्यात गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने आंदोलन करत आहे . आता आपले सरकार आले आहे , आणि  आपण राज्यातील जनतेला न्याय देण्याबाबत विश्वास देत आहेत , तसेच महाआघाडी सरकार असताना श्री देवेंद्र फडणवीस याच मागण्या करत होते , आता तेही आपल्या सोबत सरकार मध्ये आहेत , त्यामुळे या गंभीर मुद्याकडे स्वतः लक्ष देऊन खलील मागण्या तातडीने मंजूर कराव्यात , ही विनंती आज आम्ही आंदोलनाच्या मागणीतून करीत आहोत .


1 ) राज्यात दि . 1 जुलै 2022 पासून विजेच्या दरात जी 10 % ते 20 % अधिभार लावून वाढ केली ती त्वरीत मागे घ्यावी .


2 ) आपण खरे शिवसैनिक असल्यामुळे 30 % स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी . 


3 ) वीज कंपन्यांचे CAG ऑडिट करण्यात यावे . 


4 ) राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे 200 युनिट मोफत वीज देण्यात यावी अशी मागणी प्रा . डॉ.अजय घनश्यामजी पिसे संयोजक,चिमूर विधानसभा आम आदमी पार्टी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !