मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व कृषक विद्यालय सुशी येथील बालपंचायत द्वारे वृक्षरोपण.

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व कृषक विद्यालय सुशी येथील बालपंचायत द्वारे वृक्षरोपण.


एस.के.24 तास


चंद्रपूर : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री.प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक कु. निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व मुल येथील शाळा मधील  मूल  तालुक्यात  "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे.  वाढत्या औद्योगिक क्षेत्रात निसर्ग लोप पावत चालला आहे आणि यामुळे निसर्गाकडे दुर्लक्ष होत आहे. मग येणाऱ्या पिढीने निसर्गा कडे लक्ष द्यावं निसर्गाचे संगोपन करावं यासाठी कृषक विद्यालय सुशी येथील बालपंचायत यांनी  आज शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण केले. तसेच बालपंचायत यांनी बैठक घेऊन येणारे शाळेतील कार्यक्रम कसे साजरे करायचे यावर चर्चा केली. या कार्यासाठी कृषक विद्यालय सुशी येथील शिक्षक माननीय चीचघरे सर तसेच तालुका समन्वयक कुमारी निकिता ठेंगणे आणि एस एस ओ संदेश रामटेके व सी सी अमोल यांनी सहकार्य घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !