सिरोंचा तालुक्यासाठी आपतकालीन इशारा.



सिरोंचा तालुक्यासाठी आपतकालीन इशारा.


एस.के.24 तास


सिरोंचा : सिरोंच्या तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नदीमधील वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 


संभाव्य धोका लक्षात घेता तातडीने सिरोंचा तालुक्यातील पुढील १२ गावांना घरे खाली करण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून सुरक्षित निवारासाठी ठिकाणे शोधण्यात आली असून त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी स्थलांतरित व्हावे.


या गावांमध्ये सिरोंचा रै( छोटा बाजार), सूर्यरापल्ली (सिरोंचा माल),मंडलापूर,मद्दिकुंठा,जानमपल्ली वे. लँ.मृदुक्रिष्णापुर,आयपेठा रै,सोमनूर माल अंशतः, नडिकूडा, कोत्तूर रै, असरअल्ली अंशतः,अंकिसा कंबाल पेठा टोला अंशत: या गावांचा समावेश आहे. येथील पूर बाधित नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे.पोलीस व प्रशासन संबंधित गावात जाऊन संभाव्य पूरबाधित नागरिकांना १२ गावे खाली करण्यास सांगत आहेत.


सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. ताबडतोब सदर १२ गावे खाली करण्यात यावीत.याव्यतिरीक्त आवश्यक इतर गावांसाठी प्रशासन परिस्थिती पाहून निर्णय घेवू शकते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !