तालुक्यातील सारेच सिंचन प्रकल्प देत आहेत धोक्याची घंटा.; सारे तलाव ओवर फ्लो. ★ आसोला मेंढयाच्या वेस्ट वेरला सुरुवात ; मोठ्या पुष्याने केला कहर.

तालुक्यातील सारेच सिंचन प्रकल्प देत आहेत धोक्याची घंटा.; सारे तलाव ओवर फ्लो.


★ आसोला मेंढयाच्या वेस्ट वेरला सुरुवात ; मोठ्या पुष्याने केला कहर.


एस.के.24 तास


सावली : (लोकमत दुधे) गत तीन ते चार वर्षापासून निसर्गाच्या लहरी पनामुळे ओल्या आणि सुक्या दुष्काळाने भरडल्या जाना ऱ्या शेतक ऱ्यावर यंदाही दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती हंगामपूर्व धान शेतीची मशागत  आणि धान पिकाची पेरनी करुण शेतकरी राजा चातका प्रमाणे वरुण राज्याची वाट पाहात होता मात्र धान पिकाच्या पेरनी करुण काही कालावधि झाला असताना पावसाने ऐन रोवनी दरम्यान दडी मारली अधुन मधून पावसाच्या हलक्या सरी येऊन पाऊस बेपत्ता होत होता परिणामी ब्रिटिश कालीन आसोलामेंढा तलावाच्या माध्यमातुन धान पिकाच्या रोवनिला सुरूवात होणार असताना उशीर का होईना मृग ; आद्रा पाठोपाठ उंदराचे वाहन घेऊन लालेल्या पुनर्वासू ( मोठा पुष्या ) नक्षत्राने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील सा ऱ्या सिंचन प्रकल्पात  मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आजच्या घडीला सारेचे सारे तलाव तुळुब भरलेले असून अनेकांनी आपली क्षमाता गाठली असल्याने तुळुब भरलेली तलाव धोक्याची घंटा देत आहेत मात्र अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने कोणत्या तलावाची कधी वाट लागेल हे सांगणे कठिन होऊन बसले आहे सततधार पावसाने जनजीवन प्रभावित झाले असताना धान पिका सह घरा दारांचे मोठे नुकसान झाले आहे  सध्यातरी पावसाचा जोर कायम असून तळीबोळी तुळुब भरून वाहत असल्याने गतवर्ष्याच्या तुलनेत यंदा तालुक्यातील सिंचन प्रकल्पात सर्वात जास्त जलसाठा निर्माण होत असल्याचे एकंदरी पावसावरुन दिसुन येत आहे  पाऊस पडणारे  मृग आद्रा संपल्या नतर पावसाने पुर्नवसु च्या रुपात जोरदार हजेरी लावली त्या नतर ही कोल्ह्याचे वाहन धरून असलेल्या पुष्या ने पावसाची जोरदार सुरुवात केलि परिणामी धान पिकाचे मोठे नुक़सान होताना दिसते  सततच्या पावसाने चिखल परी ; मोळख़्याच्या रुपात धान पिकाची पेरनी करण्याची पाळी शेतक ऱ्या वर निर्माण झाली  त्यामुळे पावसाची दमदार हजेरी शेतक ऱ्याचे कम्बरडे मोङनारी ठरत आहे त्यामुळे  यंदा ओल्या दुष्काळाची शक्यता वर्तविली जात आहे    तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र ४९५५४.९२ हेक्टर असून ७/१२ वहिवाटितील २६०४५ हेक्टर क्षेत्र  ख़रीपाचे असून  रब्बिचे ६७२५ . ६५ हेक्टर क्षेत्र आहे यंदा परे १६९३ हेक्टर ; आवत्या ४८४० हेक्टर ; पेरिव ६१२ हेक्टर असे एकुन ११४६१ हेक्टर ख़रीपचे क्षेत्र असून कापूस ७०० हेक्टर तर सोयाबीन २९ हेक्टर अशी लागवड करण्यात आली त्यामुळे धान पिक रोवनिच्या तुलनेत आवत्या चे अधिक प्रमाणात दिसुन येत आहे सततच्या पावसाने सारेच सिंचन प्रकल्प ( तलाव ) तुळुब भरले असून नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या आसोलामेंढा तलावाच्या वेस्टवेरला सुरुवात झाली आहे जि प अंतर्गत १२० मामा तलाव ; ४२४ खाजगी तलाव ; २२१ खाजगी बोडया असून त्या अन्तर्गत हजारो शेती ओलिताखली असून या मधेहि जलसाठ्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसुन येत आहे  सिंचन प्रकल्पात जलसाठ्याचे प्रमाण मागील वर्ष्याच्या तुलनेत सर्वात जास्त असले तरी सततच्या पावसामुळे यंदा ओल्या दुष्काळाचे चित्र निर्माण होत आहे त्यामुळे शेतकरी राजा चिंतातुर झाला असून पावसाचा जोर कायम आहे.


 १)आसोलामेंढा तलाव  ( ओलिताखालील क्षेत्र ) १०५८१.९१ हेक्टर  जलसाठा १००% 


२) थेरगाव तलाव १६१ .८६  हेक्टर  जलसाठा १००%


३)उमरी तलाव ३५१.१५ हेक्टर  जलसाठा १००%


४)मामा तलाव  पाथरी १२२.७१ हेक्टर जलसाठा १००%


५) रिंगदेव तलाव १७४ .०१ हेक्टर जलसाठा १००%


६) गायडोंगरी तलाव १५६ .८० हेक्टर जलसाठा १००%


७) सामदा तलाव २२८ .७४ हेक्टर जलसाठा १००% 


८) रुद्रापुर तलाव १९७ .९२  हेक्टर जलसाठा १००% 


९) अंतरगाव तलाव ३९३ .८ हेक्टर  १०० % 


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !