शालेय मंत्रिमंडळ शपथविधी तथा 'एक वार-दप्तराविना शनिवार' चित्रकला स्पर्धा.जि.प.उच्च प्राथ.शाळा,खेमजई पं.स.वरोरा येथे.

शालेय मंत्रिमंडळ शपथविधी तथा 'एक वार-दप्तराविना शनिवार' चित्रकला स्पर्धा.जि.प.उच्च प्राथ.शाळा,खेमजई पं.स.वरोरा येथे.


एस.के.24 तास


वरोरा : आज दि.९ जुलै २०२२ रोज शनिवार ला नवनियुक्त शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला.एकूण ९ मंत्र्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री.रामकृष्ण बलकी सर यांनी मंत्रीपदाची शपथ दिली.त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची माहिती देऊन आजपासून संपूर्ण वर्षाच्या नियोजनाची धुरा मंत्रिमंडळावर सोपविण्यात आली.'एक वार-दप्तराविना शनिवार' उपक्रमांतर्गत आज प्राथमिक तथा उच्च प्राथमिक गटासाठी चित्रकला ही स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेचा विषय पावसाळा (प्राथ.) आणि पावसाळ्यातील एक दिवस (उ.प्रा.) हा होता.विद्यार्थ्यांनी मनोवेधक चित्रे काढून आनंददायी वातावरणात ही स्पर्धा पार पाडली.स्पर्धा प्रमुख श्री.ईश्वर टापरे सर आणि सोबतच शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपली कर्तव्ये पार पाडली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !