डॉक्टरांच्या निष्काळजी पनामुळे दोन वर्षीय बालकाचा महिला रुग्णालयात मृत्यु.
★ डॉक्टरावर गुन्हा दाखल करुन निलबिंत करा ;पालकासह परिवाराची मागणी.
★ गडचिरोली महिला रुग्नालयातिल प्रकार.
मा.अशोकजी नेते साहेब खासदार यांनी घेतली दखल.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे) डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे एका दोन वर्षीय बालकाचा गडचिरोली च्या महीला रूग्णालयात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. पार्थ आशीष प्रधाने २ वर्ष असे मृत बालकाचे नाव असून तो सावली येथील रहिवाशी होता आज रोजी अचानक दोन वर्षीय पार्थ ची प्रकृति बिघडल्याने त्याला उपचारार्थ गडचिरोली येथील महिला रुग्णालयात भर्ती करण्यात आले परिणामी प्रकृति खलावत असताना तीन तास होउनही कर्तव्यवर असलेल्या डॉक्टरानी साधी पहानी केलि नाही परिणामी दोन वर्षी बालकाचा मृत्यु झाला.डॉक्टरच्या निष्काळजी पनामुळे दोन वर्षीय बलकाला आपला जीव गमवावा लागल्याने पालकासह परिवारातील लोकांनी कर्तव्यवर कसूर करना ऱ्या डाक्टरावर गुन्हा दाखल करून निलंबीत करावे अशी मागणी केलि आहे.
चंद्रपूर जिल्हयातील सावली येथिल पार्थ आशिष प्रधाने या २ वर्षीय बालकाला त्याच्या कुटुंबीयांनी पहाटे ४.०० वाजता उपचारासाठी गडचिरोली येथिल महिला रूग्णालयात दाखल केले. परंतु यावेळी एकही डॉक्टर हजर नव्हते.डॉक्टर तारकेश्वर उईके यांची नेमणूक असतांना ते ड्युटीवर हजर नव्हते. वारंवार फोन करूनही डॉक्टर आले नाही.
डॉक्टर उईके आज सकाळी ७.४५ वाजता आले.तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला.या प्रकरणात मृतकांच्या कुटुंबीयांनी जिल्हा शल्य चिकित्सक व पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली त्यानूसार चौकशी सुरू केली व मृतकाचे शव पोस्ट मार्टमसाठी पाठविले घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेत मा,खासदार अशोक नेते साहेबांनी परिवराचे सत्वन करीत सदर डॉक्टरावर कार्यवाही केलि जाईल अशी ग्वाही परिवारातील लोकांना दिली सोभातच महिला रुग्णालयतिल सर्व डाक्टरांची बैठक घेऊन तसेच मा,जिल्हाधिकारी यांच्या सोभत बैठक करुण सदर डॉक्टरवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मा खासदरानी केलि त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मा,अविनाश भाऊ पाल तालुका महामंत्री ; नगरसेवक सतीश बोम्वामार मा श्याम हटवादे मा,निखिल सुरमवार मा,मनोज अमराजवार मा, चन्द्रकांत प्रधाने यावेळी उपस्थित होते.