जि.प.उच्च प्रा.शाळा,सामदा येथे शालेय बाल पंचायत स्थापन. ; बालपंचायत स्थापनेसाठी निवडणुक प्रक्रिया.
एस.के.24 तास
सावली : निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मोबाईल EVMचा वापर मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूरच्या सहकार्याने शालेय मुलांना देशातील निवडणूक पध्दतीची माहिती व्हावी या उद्देशाने तसेच मतदान जनजागृतीसाठी शालेय बालपंचायत निवडणूक घेण्यात आली.
बालपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने तसेच बाल पंचायती मधील मंत्री दुसऱ्या शाळेत गेल्यामुळे नव्याने काल दिनांक 18 जुलै 2022रोजी जि.प.उच्च प्रा. शाळा, सामदा येथे निवडणुक पध्दतीने शालेय बालपंचायत स्थापन करण्यात आली.या निवडणूक प्रक्रियेत प्रामुख्याने उमेदवारी अर्ज भरणे,माघार घेणे,प्रचार करणे,प्रत्यक्ष मोबाईल EVM चा मतदान करण्यासाठी वापर या प्रक्रियेच्या माध्यमातुन शालेय बालपंचायत निवडणुक पार पडली.
शालेय बालपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्याध्यापक मडावी सर, सहाय्यक शिक्षक घनश्याम हत्वादे सर,प्रदीप गांग्रेडिवार सर,वालदे सर, राकेश तलांदे सर, विनोद टिकले सर,सूरज नखाते, यांचे उपस्थित हि प्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण केली.
यावेळी,शाळा सहाय्यक अधिकारी निशा उमरगुंडावार,श्रद्धा नागमोते यांचे सहकार्याने निवडणुक प्रक्रिया पार पडली.निवडणुक प्रक्रियेनंतर निकाल जाहिर करण्यात आला. निवडुन आलेल्या उमेदवार विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन शपथ ग्रहण सोहळा पार पडला.
यावेळी,अतिशय शांतता ठेऊन तसेच नियमांचे पालन करुन बालपंचायत निवडणूक यशस्वीरीत्या पार पडली.