कलेसोबतच निसर्गभान जपणाऱ्या अण्णाभाऊ साठे कलामंचाचे सर्वत्र कौतुक. मुग्दाई प्रेरणास्थळावर कलावंतांनी राबवली स्वच्छता मोहीम.

लेसोबतच निसर्गभान जपणाऱ्या अण्णाभाऊ साठे कलामंचाचे सर्वत्र कौतुक.


मुग्दाई प्रेरणास्थळावर कलावंतांनी राबवली स्वच्छता मोहीम.


एस.के.24 तास


चिमुर : संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या चिमूर तालुक्यातील विरांगणा मुग्दाई प्रेरणास्थळ व धबधबा कचरा मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंच, वरोरा यांच्यावतीने दिनांक 31 जुलै 2022 रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कलेसोबतच निसर्गभान जपणाऱ्या कलामंचाच्या सदस्यांचे उपस्थित पर्यटकांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी कलामंचाचे संचालक विलास चौधरी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.


परिसरातील आदिवासींचे विरांगणा मुग्दाई प्रेरणास्थळ व धबधबा हजारोच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात. जिथं माणसं तिथं कचरा हे समीकरणचा आता दुर्दैवाने निर्माण झालेलं आहे. पर्यटक येत असताना स्वतःसोबत विविध स्वरूपाचा कचरा सुद्धा वाहून आणत आहे. निसर्गरम्य व प्रदूषणविरहित परिसराला दुर्गंधीयुक्त व कचरायुक्त करण्याचे असंख्य प्रकार या ठिकाणी घडत आहे. प्रेरणास्थळाला भेटीसाठी आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंच वरोरा यांचे कलावंतांनी हा प्रकार प्रत्यक्षात बघितला. त्यानंतर त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. कलामंचाच्या सदस्यांनी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचे  उपस्थित पर्यटकांनी सुद्धा कौतुक केले. ही मोहीम सुरू असताना अनेक पर्यटकांनी व्हिडिओ फोटो सुद्धा काढले. विदर्भात सुप्रसिद्ध असणाऱ्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कलामंचाच्या वतीने गावागावात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येतात. यवतमाळातील बळीराजा चेतना अभियान, गाडगेबाबा स्वच्छता अभियान, विविध शासकीय योजनांची जागृती अशा असंख्य मोहिमेत त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. हे विशेष.


 विरांगणा मुग्दाई प्रेरणास्थळाला भेट देणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासोबतच पर्यावरणाचे व निसर्गाचे नुकसान होणार नाही याचे सुद्धा भान ठेवावे अशी आवाहन कलामंचाच्या सदस्यांनी यावेळी केले.

या मोहिमेत माधुरी चौधरी,

,ज्ञानेश्वर खांडेकर, वर्षा खांडेकर ,बंडू चौधरी, नैना चौधरी, प्रशांत पोईनकर, सीमा पोईनकर कार्यकारणी सदस्य कुटुंबासहित सहभागी झाले होते.  सोबत सहकारी सदस्य कमलाकर कापटे, प्रशांत दडमल, शेखर धाबेकर, प्रदीप चौधरी,  जस्सी भगत, पल्लवी दडमल, सोनू दडमल, अनु चौधरी ,अंकित नन्नवरे , अमित घोडमारे, भूषण श्रीरामे, विश्वनाथ गायकवाड, विजय गुरनुले, शैलेश   वाळके सहभागी झाले होते. स्वच्छता मोहीम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतिचे उपसरपंच विशाल नन्नावरे यांनी मोलाचे सहकार्य केले.


निसर्गाने निशुल्क व निस्वार्थी होऊन आपल्याला खूप काही भरभरून दिले आहे. त्याचे जतन व संवर्धन केल्यास ते पिढ्यानपिढ्या टिकते. परंतु पर्यटक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची प्रत्येक पर्यटकांनी जाणीव ठेवणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन हा प्रत्येक माणसाचा धर्म आहे. विरंगणा मुग्धाई प्रेरणास्थळाचा परिसर प्रदूषण मुक्त करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंच वरोराचे संचालक विलास चौधरी यांच्या नेतृत्वात राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी सदस्यांना सलाम आहे.

अजय नन्नावरे,पुणे

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !