क्रांतीबा बहु.युवा विचार मंच,चिरोली तर्फे वृक्षारोपण.

क्रांतीबा बहु.युवा विचार मंच,चिरोली तर्फे वृक्षारोपण.


राजेंद्र वाढई ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास


मुल : महात्मा फुले यांनी 3 जुलै 1852 ला दलीत मुलांसाठी पहिली शाळा काढली त्यानिमित्त चिरोली येथे क्रांतीबा युवा विचार  मंच ने चिरोली ला सरपंच मीनल लेनगुरे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

 या वेळी क्रांतिबा युवा मंच चे संतोष अलोने,सुभाष निकूरे,अनिल गदेकार,सुनील सोनुले,राजेंद्र शिंदे,नरेश वाघाडे,लीलाधर गुरणूले, दुर्वेश कामीडवार,विशाखा पुण्यप्रेडिवर,पूजा निकुरे,सारिका गदेकार,चंदा मंडरे, लोकेश अलोणे,मंगेश कपाट,गोकुळ मोहुर्ले, करण मोहूर्ले,माणिक गदेकार,अनिल कोटणाके पोलीस पाटील मंदातुकुम उपस्थित होते.


 पिंपळ वृक्ष कार्बन-डायऑक्साइड १००% शोषून घेतो, पिंपळ ची  झाडे परिसराला थंड हवामान तसेच ऑक्सिजन देऊन नैसर्गिक वातावरण ताजेतवाने ठेवण्याचे काम करतो.


बऱ्याचदा आपणच लोकांना खुश करण्यासाठी ह्या झाडांना लावणे टाळले आणि उलट यूकेलिप्टसची (नीलगिरी) झाडे लावण्यास सुरुवात केली. यूकेलिप्टस फार पटकन वाढते आणि दलदलिची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते. ज्यामुळे जमीन जलविहीन होते. गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्व महामार्गांवर दुतर्फा लावले  गेले आहेत. त्यामुळे  नैसर्गिक ताजेतवाने न राहिल्याने, उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे. 


पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात.येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर एक एक पिंपळ झाड लावले तर प्रदूषणमुक्त भारत होईल.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !