इलेक्ट्रिक शॉकनी जळाल्याने सिक्युरिटी गार्ड गंभीर जखमी.

इलेक्ट्रिक शॉकनी जळाल्याने सिक्युरिटी गार्ड गंभीर जखमी.

सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास


सावली : येथील रहिवासी चेतराम रघुनाथ मानकर वय, ३५ वर्ष हा एम.एस.ई.बि.कार्यालय सावली अंतर्गत च्या मौजा चकपिरंजी येथील ३३ के.वि.विद्युत वितरण वाहिनी मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून मागील १३ वर्ष पासून कार्यरत आहे.दिनांक,३/७/२२ रोजी नेहमी प्रमाणे रात्रो, ८.०० वाजता चकपिरंजी येथील ३३ के.वि.विद्युत वाहिनी च्या कामावर गेला होता.कामावर हाजर होताच तिथे कार्यरत अधिकारी यांनी बंद पडलेला विद्युत प्रवाह सुरु करणे आणि रीडिंग घेणे बाबत काम सांगितले.


 अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आदेशानुसार सिक्युरिटी गार्ड चेतराम मानकर हा विद्युत प्रवाह सुरु करावयास गेला. असता शार्ट सर्किट होऊन डीपी जळाल्याने अग्निज्वाला बाहेर निघून चेतराम याचे शरीर,हात पाय जळाले व विद्युत शॉक लागल्याने तो बेहोशीत खाली पडला. कार्यालयात ड्युटीवर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी लगेच त्याला सावली च्या ग्रामीण रुग्णालयात नेले.


 परंतु तिथून त्याला रेफर करून चंद्रपुर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.घडलेल्या घटनेची प्राथमिक माहिती एम.एस.ई.बि. कार्यालया मार्फत पोलीस स्टेशन सावली येथे दिली.असता तर प्राथमिक स्वरुपात गुन्हा नोंद करून घेतला असल्याचे ठाणेदार सावली यांनी सांगितले.परंतु दवाखान्यातून येणाऱ्या रिपोर्ट प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास करण्यात येईल अशी माहिती दिली.  


 या घडलेल्या घटनेच्या संदर्भात एम.एस.ई.बि. कार्यालयाशी संपर्क केला असता तर घडलेल्या घटनेबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करून तो स्वताच आत्महत्या करण्याचे बहाण्याने विद्युत तारांना स्पर्श केल्याचे उडवा उडवीचे उत्तरे अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहे. 


सिक्युरिटी गार्ड चेतराम मानकर गंभीर जखमी झाल्याने त्यास चंद्रपुर वरून नागपूर येथील दवाखान्यात हलविण्यात आले असून औषध उपचार सुरु आहे.मात्र एम.एस.ई.बि. कार्यालय आणि सिक्युरिटी बोर्ड यांचे कडून चेतराम मानकर यास कोणतीही मदत देत नसल्याबाबत चेतराम मानकर,आई शकुंतला मानकर आणि पत्नी वैशाली मानकर यांनी नाराजी व्यक्त करून चेतराम मानकर यास आर्थिक मदत देण्याबाबत विनंती केलेली आहे. 


सिक्युरिटी गार्ड ला फीडरचे काम करण्याचा अधिकार नाही. विद्युत प्रवाह सुरु करणे किंवा बंद करणे हा देखील अधिकार नाही.तरी पण एम.एस.ई.बि. कार्यालयाकडून हे सर्व काम करवून घेतल्या जातात हा गुन्हा आहे.याकडे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्यतेणे लक्ष द्यावे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !