चिरोली गाव तलावाचे ओव्हर फ्लो झाल्याने अनेकांच्या घरात घुसले पाणी.
राजेंद्र वाढई ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील चिरोली येथे गावालगत असणाऱ्या गाव तलावाची पाण्याची पातळी अचानक वाढल्याने तलावाच पाणी गावातील शालुबाई गावतुरे,संतोष यातावार,अलोने,यांच्या घरात घुसले.परिणामी गावातील 3 ते 4 घरातील जीवन उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.चिरोली येथील तलाठी,करे साहेब तातडीने दखल घेऊन घरांची पाहणी केले.
गावा लगत असलेला जुना असा गाव तलाव आहे या गाव तलावांमध्ये बारमाही पाणी साठा असतो यावर्षी झालेल्या अति पावसामुळे दिनांक,23 जुलै रोजी पहाटे पाच च्या सुमारास तलावाची पाणी गावात घुसण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता पाण्याचा वेग वाढल्याने गावातील 3 ते 4 घराचे तलावाचे पाणी घुसले अचानक आलेल्या पाण्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले. या संदर्भातली माहिती तलाठी करे साहेब यांना कळाल्यानंतर तातडीने गावाला भेट दिली.