जि.प.उच्च प्राथ.शाळा खेमजई येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना.

जि.प.उच्च प्राथ.शाळा खेमजई येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना.


एस.के.24 तास


चिमुर : आज दि.2 जुलै 2022 रोजी जि.प.उच्च प्राथ.शाळा.खेमजई येथे प्रत्यक्ष निवडणूक घेऊन मतदारांनी आपले मत देत उमेदवारांची निवड केली.एकूण 9 पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली.त्यामध्ये शालेय मुख्यमंत्री कु.नियती चौधरी,वर्ग 7 वी, उपमुख्यमंत्री आदित्य लांडगे वर्ग 7 वी,सांस्कृतिक मंत्री कु.अश्लेशा चौधरी वर्ग 7वी,क्रिडामंत्री कु.मोनिका तुमसरे वर्ग 7वी,स्वच्छता व आरोग्य मंत्री ओम कापटे वर्ग 6 वी,परिपाठ मंत्री कु.हर्षाली डाखोरे वर्ग 7वी,शालेय पोषण आहार मंत्री कु.मेघा चौधरी वर्ग 6वी,शिक्षण मंत्री कु.श्रावणी चौधरी वर्ग 6वी आणि पर्यावरण मंत्री कु.भाविका घरत वर्ग 5वी यांची बहुमताने निवड करण्यात आली.निवडणूक प्रक्रियेत  अधिकारी क्र.1 कु.काव्या गायकवाड आणि अधिकारी क्र.2 कु.नेहा चौधरी यांनी आपली भुमिका पार पाडली. दि.9 जुलै ला सर्व मंत्रिमंडळ आपल्या पदाची शपथ घेणार आहेत. मुख्याध्यापक श्री.रामकृष्ण बलकी, श्री.संजू जांभुळे,सौ.चेतना मून,श्री.रविंद्र साखरकर, श्री.अनिल वाघमारे आणि श्री.ईश्वर टापरे या शिक्षकांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया शिस्तीत पार पडली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !