सततधार पावसाचा फटका शेतकरी संकटात.
★ नदी नाल्याने रस्ते वेढले अनेक गावांचा संपर्क तुटला प्रशासन सज्ज.
★ पावसामुळे घरांदाराची मोठी नुकसान.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे) गेल्या आठवड्या भरापासून सततधार पावसाने झोडपल्याने अनेक नदी नाले क्षमतेपेक्षाही अधिक वेगाने दुतर्फा वाहू लागले सोभातच तालुक्यात रात्री झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून पिकाची नासाडी झाली तर अनेक जमिनीवरुन पुराच्या पाण्यामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे तर अनेक शेत जमीनी पण्याखाली असल्याचे दिसुन येत आहे गावाच्या शेजारी असलेली अनेक नाले भरल्याने पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक काहीशी ठप्प झाली तसेच पावसाने घरांची पडझड तसेच शेतामध्ये पाणी घुसून शेतकऱ्यांची मोठी हानी झाली अतिवृष्टी पावसाचा फटका नाल्या काठावरील अनेक गावाना आणि शेतीला बसला असून शासनाने पंचनामे करुण मदत करावी अशी मागणी केलि जात आहे.
गेल्या आठवड्यात भऱ्यापासून सततधार पाऊस सुरूअसल्याने पावसाच्या पुराने नदी नाले लगत असलेल्या गावांना पुराने वेढा घातला असून पुराचा धोका लक्षात घेता पोलीस प्रशासन,व तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक व इतर कर्मचारी गावात तळ ठोकून असून परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येत आहे आज रोजी पावसाने उसंत घेतल्याने काहीशी मोकळीक मिळाली असली तरी गावाजवळील पुराच्या पाण्याची पातळी कमी होत आहे मात्र नदीच्या पुरामुळे आणि नदी,नाने तुळुब भरून वाहत असल्याने शेती जामिनिची वाट लागली असून पूर्णतः पीक उध्वस्त झाले असल्याने शेतक ऱ्याचे मोठे नुकसान पावसाने केले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे सततधार पावसामुळे तालुक्यातील जिबगाव उसेगाव ; अंतरगाव नीमगांव ; देवटोक शिर्शी ; चारगांव भारपायली सावली ; लोंढोली चामोर्शी ; अनेक मार्गाचा संपर्क तुटला सोभातच सततच्या पावसामुळे तालुक्यातील १३० घरांची मोठी नुक़सान झाली तर करोली येथील तीन घर स्थानांतरित करण्यात आले असून तालुक्यात सरासरी ११२ .३३ मि मि पावसाची नोद करण्यात आली असून पावसाचा जोर कायम असल्याचे दिसुन येत आहे काल रात्री पावसाने झोड़पुन टाकल्याने ज नजीवन विस्कळीत झाले अनेक ठिकानाचा संपर्क तुटला याची गंभीर दखल घेत भाजपाचे तालुका महामंत्री ; नगर सेवक मा सतीश भाऊ बोम्मवार यानी काही भागाची पाहणी केलि आणि या बाबतच्या कल्पना संबंधित अधिक ऱ्याना देण्यात आल्या सततधार पावसाने कहर माजविल्याने शेतकरी तशेच गरीब जनातेचे घर कोसलून मोठे नुकसान झाले त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करुण नुक़सान झालेल्या जनतेला मदत करावी अशी मागणी तालुका महामंत्री सतीश भाऊ बोमावार यांनी केली.