प्रभाग क्रमांक 7 बोथली रोड सवारीच्या बंगल्यासमोर चिखलाचे साम्राज्य.
एस.के.24 तास
नागभीड : आता मोहरम सन येत्या 31 तारखेला आहे.व नागभीड शहरात मोहर्रम सन याच ठिकाणी साजरा केला जातो.या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून चिखलाचे साम्राज्य झालेले आहे. तेथील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खुप त्रास आहे. तसेच तेथे नाली सफाई केली होती त्याचाई नाली उपसाई घानकचरा पडून आहे.
त्यामुळे रोगराईचे प्रणाम वाढलेले आहे.येथील लोकांनी कित्तेकवेळा तक्रार केली पण कोनी लक्ष देइना तसेच एक महीने पाहिले येथील टूटलेला पुला सम्बंधि निवेदन राष्ट्रवादी कांग्रेसने दिला होता. त्या पुला सम्बन्धही नगरपरिषदने लक्ष दिले नाही. याकडे लक्ष दयावे व त्वरित हा चिखल असलेले जागा नगरपरिषद स्वच्छ करावी अशी मागणी करण्यात येत आहे.