ट्रॅव्हल्स चिंचोली नाल्यावर पुराच्या पाण्यात अडकल्याने प्रवाशांचा जीव मुठीत. ★ विरूर पोलिसांचे धाडस,35 प्रवाशांचे वाचवले जीव.



ट्रॅव्हल्स चिंचोली नाल्यावर पुराच्या पाण्यात अडकल्याने प्रवाशांचा जीव मुठीत.

★ विरूर पोलिसांचे धाडस,35 प्रवाशांचे वाचवले जीव.


एस.के.24 तास


राजुरा : हैद्राबाद कडून राजुरा तालुक्यातील चिंचोली (विरुर) मार्गे छतिसगड कडे जाणारी ट्रॅव्हल्स चिंचोली नाल्यावर अडकल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. सदर घटणेची माहिती मिळताच विरुर पोलिसांनी मदत कार्य आरंभ करून अथक परिश्रमाने सर्व प्रवाशांना बाहेर सुखरूप काढण्यात मौलाचे कार्य केल्याने मोठा अनर्थ टळला.

तेलंगणा राज्यात कामासाठी गेलेले छतिसगड राज्यातील मजूर परत आपल्या राज्यात एका खाजगी ट्रॅव्हल्स ने निघाले. तेलंगणा तिल शिरपूर मार्गे चिंचोली विरुर मार्गे येत असताना चिंचोली नाल्यातील पुलावर पाण्याचा अंदाज न घेता ट्रॅव्हल्स वाहन चालकाने टाकली आणि त्यात फसली. सगळीकडे पाणीच पाणी जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू झाली. त्यातिल एका व्यक्तीने प्रसंगावधान राखून पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून माहिती दिली.


विरुर पोलिसांना संदेश मिळताच क्षणाचाही विलंब न करता सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल चव्हाण आणि पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.व रेस्क्यू मोहीम सुरू केली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नाने जीव धोक्यात घालून बस मधील 35 लहान बालकांसह पुरुष व महिला प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. लगेच त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. विरुर पोलिसांच्या व नागरीकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !