सावली - हरंबा रोड वरील जिबगाव जवळ ट्रक फसला ; 3 तासापासून रस्ता बंद.
सार्वजनिक बांधकाम विभाग व सिंचाई विभागाच्या दिरंगाई चा झटका,जनतेला बसते फटका.
सुरेश कन्नमवार !मुख्य संपादक!एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील हरांबा लोंढोली, जिबगाव, साखरी मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून डांबरीकरण उखळल्याने अनेक ठिकाणी उघडले आहे. या मार्गावरील मोठे खड्डे धोकादायक ठरत आहेत.
सध्या पावसाचे दिवस असल्याने मोठ्या खड्यात नेमका पाणी किती आहे हे लक्षात येतं नाहीं हेच खडे अपघातास कारणीभूत ठरतात.जिबगांव हरांबा परीसरातील नागरीकाचे तालुक्याच्या ठिकाणी तहशिल,प.स, महाविध्यालय,शाळा दवाखाना, बाजार पेठ करीता दररोज ये-जा असते.तसेच रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात वाहनाची रेलचेल सुरू असते.
त्यामुळे रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य झाले असून रस्त्यांवर दुरवस्था झाली आहे.
रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण उघडले असून दोन ते तीन फुटाचे पसरट खड्डे पडले आहेत तर गोसेखुर्ड अतर्गत पाईप लाईन चे काम हे थातूर मातूर केल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.कारण या मार्गावरून गोसे विभाग पाईप टाकली त्यात दगड,चुरी भरून व्यवस्थित करायला पाहिजे मात्र त्यात माती टाकून भुजविले मात्र पावसाच्या पाण्याने ते माती खाली गेल्याने वाहने फसायला सुरुवात झाली आहे. आज दुपारी 12 वाजता च्या दरम्यान एक ट्रक फसल्याने सावली-हरंबा मार्गावरील वाहतूक ही 3 तासापासून बंद आहे.वाहन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
मात्र अनेक वाहन फसत असल्याने गोसेविभाग व बाधकाम विभागाना विचारणा केली असता उडवाउडविचे उत्तर देत आहे . या मार्गावर मोठे खड्डे पडले असून वाहन चालकास वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते रस्त्याची एवढी दुरवस्था झाली आहे असून सावली बांधकाम विभागचे दुलर्क्ष होताना दिसत आहे.असा आरोप वाहन धारकांकडून केला जात आहे.
एकीकडे पालकमंत्री भुमीपुजन केल्याचे बोर्ड तर दुसरी कडे निधी नसल्यामुळे बाधकाम विभागाचे अधिकारी यांचे कडुन सांगण्यात येत आहे निधी अभावी सावली हरांबा रोडचे काम थांबले असल्याचे सांगितले असल्यामुळे अनेक पश्न निर्मान होत आहेत तरी वेळीच लक्ष देउन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.