तब्बल 11 वर्षानंतर कुटुंब नियोजनाचे शिबीर संप्पन्न.
एस.के.24 तास
सिंदेवाही : तालुक्यातील गुंजेवाही येथे जिल्हा परिषद विभागाचे आरोग्य वर्धिनी केंद्र आहे, परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या आरोग्य वर्धिनी केंद्रात परिसरातील जनता आरोग्याची तपासणी करण्या साठी मोठ्या प्रमाणात येतात. हा परिसर जंगलव्याप्त असल्याने वन्य प्राण्याचे वास्तव असल्याने या परिसरात भीतीचे वातावरन आहे.2011 ला याच आरोग्य वर्धिनी केंद्रात वाघाने आरोग्य वर्धिनी केंद्रातील कर्मचारी यांना आरोग्य वर्धिनी केंद्रातील निवास्थानी जाऊन बळी घेतला होता त्या मुळे या परिसरातील कर्मचारी यांचे मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तेव्हा पासून इथे कुठलेही शिबीर घेण्यात आले नव्हते. परंतु तब्ब्ल 11 वर्षा नंतर ग्रामपंचायत सदस्य पुणेश गंडलेवार, सरपंच सदस्य व आरोग्य वर्धिनी केंद्रातील डॉक्टर कर्मचारी वृंद यांच्या पुढाकारातून शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उदघाटन डॉक्टर पटले साहेब व ग्रामपंचायत सदस्य पुणेश गंडलेवार यांच्या हस्ते रिबीन कापून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली व शिबीर यशस्वी रित्या पार पाडण्यात आले. त्या मुळे गुंजेवाही व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, शिबीर यशस्वी करण्या करिता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंभरकर मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बुधे सर शस्त्रक्रिया तज्ञ् डॉक्टर पटले सर ग्रामपंचायत सदस्य पुणेश गंडलेवार, आरोग्य सहाय्यक आकरे, बेद्रे, नकुले,खंदाडे, बोबाटे आरोग्य सेविका रामेडवार, राऊत, बुटले, धापटे, सुंदरगिरी, मारबते परिचर आकाश मोगरे वतन दुर्गे व इतर कर्मचारी उपस्थित होते.