मँजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली संस्थेच्या वतीने आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यामधील विविध गावात शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.

मँजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली संस्थेच्या वतीने आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यामधील विविध गावात शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.


एस.के.24 तास


गडचिरोली : मँजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री.प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गद्शनात व तालुका समन्वय देवेंद्र हिरापुरे सर यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली तालुक्यातील जेप्रा, राजगाटा माल, राजगाटाचक व खरपुंडी,बामणी,आंबेशिवानी आंबेटोला,  आणि तालुक्यातील इतर गावामध्ये  मागील वर्षापासून " होलिस्टिक एज्युकेशन टाटा प्रोजेक्ट "हा कार्यक्रम अविरतपणे चालू आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून  शाळेचा प्रवेश दिवस साजरा करण्यात आला.


दि,29/06/2022 ला या कार्यक्रमधे रॅली काढण्यात आली. नवीन भरती पात्र असलेल्या मुलांना माना सन्मानाने शाळेत आणंन्यात आले. आणि जे विद्यार्थी शाळेत दाखल आहेत त्यांना शाळेत नियमित येण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्देश : - 


        1) कोणताच विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये.


         2) मुलांनी नियमित शाळेत यावे.


3) मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी.


             

वरील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जीवन कौशल शिक्षक,देवाजी बावणे,लेखाराम हुलके,विषक शिक्षिका,रीना बांगरे यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !