गुरवळा येथील नेचर सफारी क्षेत्रातील एफ.डी.सी.एम क्षेत्रातील जंगल कटाई तात्काळ बंद करण्याबाबत निवेदन.


गुरवळा येथील नेचर सफारी क्षेत्रातील एफ.डी.सी.एम क्षेत्रातील जंगल कटाई तात्काळ बंद करण्याबाबत निवेदन.


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास


गडचिरोली : वन विभागातील गडचिरोली परिक्षेत्रातील गुरवळा उपक्षेत्रात मोठ्याप्रमाणात झुडपी व मोठ्या झाडांचे जंगल (मिश्र जंगल) असून जंगलाचे क्षेत्र घनदाट असून मोठ्या प्रमाणात प्राण्यांची गणना झाल्यामुळे वनविभाग व संयुक्त वनवयवस्थापन समिती गुरवळा यांचे संयुक्त विद्यमानाने गुरवळा नेचर सफारी तयार करण्यात आली. 

गुरवळा नेचर सफारी मध्ये वाघ,बिबट,अस्वल, नीलगाय,तळस,कोल्हा,लांडगा,चौशिंगा,चिंकारा,चितळ, रानकुत्रा, चांदी अस्वल, सायाळ, खवले मांजर,उदमांजर, व रानडुक्कर इत्यादी प्राणी व मोर,चिकरा,होला,चिरक,दयाळ, खाटीक,सुतार,ढीवरपक्षी,कोतवाल,भारद्वाज, नीलकंठ,पोपट,वेडा राघू,मैना,कोकिळा,राघू, शाही बुलबुल,व उडणारी खार इत्यादी पक्षी गुरु वडा नेचर सफारी मध्ये आढळून येत आहेत. गुरवळा नेचर सफारी ला लागून असलेल्या कक्ष क्रमांक 151 160 व 153 मध्ये महाराष्ट्र वन विकास महामंडळ (एफडीसीएम )विभाग यांनी जंगल कटाई चे कामे सुरू केले आहे.  

सदर कटाई मध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होत असून अस्तित्वात असलेले प्राणी व पक्षी गुरवळा नेचर सफारी चे जंगल सोडून इतरत्र जात असल्याचे प्रत्यक्षात दिसून आले. सदरचे प्राणी व पक्षी इतरत्र गेल्यास त्यांची शिकार होण्याची दाट शक्यता आहे तसेच मनुष्य- वन्यप्राणी संघर्ष मध्ये वाढ होऊन हानी होण्याची शक्यता आहे.


गडचिरोली जिल्हा वन व्याप्त जिल्हा असून जिल्ह्यामध्ये एकही वनपर्यटन व कोणाचे आनंद देणारी सफारी क्षेत्र नव्हते. यामुळे गडचिरोली वन विभागामध्ये प्रथमता वनपर्यटन सफारी सुरू करण्यात आली. गडचिरोली वन विभागातील परिसरात सण 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्य- वन्यप्राणी संघर्ष घटना झाल्यामुळे स्थानिक लोकांचा वन विभागावर रोष निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये वन्य प्राण्या बद्दल आपुलकी निर्माण व्हावी म्हणून वेळोवेळी स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करून सहानुभूती निर्माण करुन गडचिरोली वन विभागाच्या व संयुक्त वन व्यवस्थापन समिती गुरवळा यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवडा नेचर सफारी सुरू करण्यात आली.


गुरवळा नेचर सफारी चे 10 डिसेंबर 2019 रोजी उद्घाटन करून नेचर सफारी सुरू करण्यात आली. यामध्ये स्थानिक गावातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून एकूण दहा गाईड यांची नियुक्ती करण्यात आली सदर गाईड यांनी माहे सप्टेंबर 2021 पासून विनामानधन आने परिश्रम करून गुरवळा नेचर्स परळीतील पानवटे ,गवती कुरण इत्यादी कामे पुर्ण केलेले आहे. गुरवळा नेचर सफारीमध्ये माहेर डिसेंबर 2021 पासून ते आजतागायत 3000 पर्यटक सफारीमध्ये येऊन सफारीचा आनंद घेऊन अभिप्राय नोंदविला आहे. गुरु वडा नेचर सफारी चे संपूर्ण कामे सांभाळून सण 2022-23 या वर्षातील आगीच्या हंगामामध्ये आग लागू नये म्हणून विविध उपाययोजना करून गावागावांमध्ये जनजागृतीचे कामे केले. गुरवळा नेचर सफारी सुरू झाल्यानंतर सदर क्षेत्रांमध्ये अवैध वृक्षतोड व प्र वन्यप्राण्यांच्या शिकारी करणार यावर आळा घालण्याकरीता सतत गस्त करून सहकार्य केला आहे, सदर क्षेत्रामध्ये गुरे जराही करिता येत असलेल्या भुरे व संबंधित पुरे मालक यांना प्रवेश न देता सदर क्षेत्रातील अस्तित्वात असलेले जंगलाचे संरक्षणाची कामे करीत आहे. यामुळे जंगलाची उत्तम संरक्षण व संवर्धन होत असून त्यातून स्थानिकांना रोजगार प्राप्त झालेला आहे.


गुरुवळा नेचर सफारी मधील पक्ष क्रमांक 151 160 व 153 मधील वन विकास महामंडळ कडून होणारी तोड तात्काळ थांबण्याची सूचित करावे तसेच सदर क्षेत्र वन विभागातील पूर्व गुरवळा विटा मध्ये समाविष्ट करून घ्यावे किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती गुरवळा यांना हस्तांतरण करण्यास विनंती आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !