मुल तालुक्यातील सहकार क्षेञावर काँग्रेसचे बल्ले बल्ले.

मुल तालुक्यातील सहकार क्षेञावर काँग्रेसचे बल्ले बल्ले.


नितेश मँकलवार ! उपसंपादक ! एस.के.24 तास


मुल : पार पडलेल्या सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीत काॅंग्रेस समर्थीत आघाडीने बहुतांश संस्थेवर एकहाती सत्ता मिळविल्याने तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्यें उत्साहाचे वातावरण पसरले असुन सहकार क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापीत करता न आल्याने काॅंग्रेस विरोधी गटात माञ अस्वस्थता दिसून येत आहे.  

      अलीकडेच सहकार विभागाच्या वतीने तालुक्यातील सतरा पैकी मूल, बेंबाळ, भेजगांव, नवेगांव भुजला, राजोली, फिस्कुटी, चिखली, चिरोली, सुशी दाबगांव, राजगड, गडीसुर्ला, डोंगरगांव, मारोडा आणि मूल येथील प्राथमिक सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळासोबतचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुका घेण्यांत आल्या. १७ पैकी जुनासुर्ला आणि चांदापूर या दोन संस्थेचा कार्यकाल डिसेंबर पर्यंत  आहे. त्यामूळे शासनाच्या आदेशान्वये सध्या १५ संस्थेच्या निवडणुका घेण्यांत आल्या. झालेल्या १५ सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे वर्चस्व प्रस्थापीत व्हावे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनात काॅंग्रेस पक्षाने आघाडया निर्माण केल्या. निर्माण केलेल्या आघाडयांमध्यें सर्वसमावेशक उमेदवारांची निवड आणि  रणनितीचा वापर करून काँग्रेस समर्थीत आघाड्या निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर पंधरा पैकी चवदा संस्था काबीज करता आल्या. केवळ राजोली येथील सेवा सहकारी  संस्थेच्या निवडणुकीत काॅंग्रेस समर्थीत आघाडीला ६ जागांवर विजय संपादन करता आला, भाजपा समर्थीत आघाडीने या ठिकाणी ७ जागांवर विजय प्राप्त केला. राजोली वगळता मूल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि प्राथमिक सेवा सहकारी संस्थेशिवाय तालुक्यातील बारा सेवा सहकारी संस्थेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत केले. सतरा पैकी जुनासुर्ला आणि चांदापुर या दोन सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका डिसेंबर मध्यें होणार असल्या तरी सध्यास्थितीत या दोन्ही संस्थेवर काॅंग्रेस समर्थीत संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यामूळे आज तालुक्यातील सहकार क्षेत्रात काॅंग्रेसचे बल्ले बल्ले सुरू असून भविष्यात होणा-या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही बल्ला मारण्यासाठी तालुक्यातील काॅंग्रेसवीर सज्ज असल्याची चर्चा आहे. सतरा पैकी एक असलेल्या नांदगांव सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे दोन गट  आमने सामने उभे राहीले परंतू याही ठिकाणी काॅंग्रेसच्या रावत समर्थीत उमेदवारांनी काॅंग्रेसच्या दुसऱ्या गटाच्या उमेदवारांना धुळ चारत विजय संपादन केले तर डोंगरगांव सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काॅंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकतेची मोट बांधत विरोधकांचा पराभव केल्याने याही ठिकाणी काॅंग्रेसच विजयी झाली, झालेल्या सहकार क्षेत्रातल्या निवडणुकीत काँग्रेसचे रावत आणि त्यांच्या समर्थकांनी अहोराञ परीश्रम घेतले. परंतु बँनरवर झळकणारे, निवेदन देणारे, नेत्यांच्या भेटी सोबतच त्यांच्या अवतीभोवती घुटमळत स्वतःला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समजणारे आणि त्यांचे समर्थक माञ झालेल्या निवडणुकीत शोधुनही दिसले नाही. भाजपाच्या वर्चस्वात असलेल्या विधानसभा क्षेत्रातील मूल तालुक्यात काँग्रेसच्या एकट्या रावत गटाने विरोधकांचा सामना केला. तालुक्याच्या राजकारणात पंचायत समिती आणि नगर परीषदेवर वर्चस्व गाजवतांना माञ सहकार क्षेत्रात भाजपाला पाहिजेे त्या प्रमाणात आघाडया निर्माण करता न आल्याने काॅंग्रेसने सहकार क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापीत केले. त्यामूळे स्थानिक काॅंग्रेसवीर आनंदी असले तरी विरोधक मात्र काहीसे अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. तसेच सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष श संचालकाचे तालुका काॅग्रेस कमैटी मुल च्या वतिने अभिनंदन करण्यात आले व आभार घनश्याम येनुरकर .राकेश रत्णावार .संदीप कारमवार अखिल गागरेड्डीवार .राजेद्र कान्नमवाल. किशोर घडसे .रूपालीताई संतोषवार .पवण निलमवार. गुरू चोधरी .रूमदेव गोहणे.शाताराम कामडे .सुनिल गूज्जनवार .पुरषोत्तम वासेकर सूनिल शेरकी .व्यकटैश पुल्लकवार .बंडु गुरूनुले यानी सर्वाना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !