सुपुष्पमंगल संस्थेच्या वतीने माणूसकीची दोरी या उपक्रमाचे आयोजन.

सुपुष्पमंगल संस्थेच्या वतीने माणूसकीची दोरी या उपक्रमाचे आयोजन.


एस.के.24 तास


मुल : मागील दोन वर्षांपासून  सुपुष्पमंगल संस्थेच्या वतीने श्री. मा. किरण जी नागापुरे यांनी माणुसकीची दोरी या उपक्रमाचे आयोजन करुण वापरन्यास योग्य असलेले पण न वापरात असलेले वस्तु कपडे,बुक,पेन,डायरी,स्कूल बग या वस्तू गरजु लोकांपर्यंत विनामूल्य पहोचविण्यासाठी काम करीत आहेत आज चकघोसरी येथे माणुसकीची दोरी या उपक्रमाचे आयोजन करत गावातील चौकात एक दोरी बांधून त्यावर कपडे ठेवण्यात आले.

कपडे ठेवून झाल्या नंतर गावातील गरजु लोकांनी दोरीवर ठेवलेले विनामूल्य कपडे घेवुन गेलेत... या वेळी या कार्यक्रमाला उपस्थित माणुसकीची दोरी या उपक्रमाचे जनक श्री.मा.किरण जी नागापुरे व सुपुष्पमंगल बहुद्देशीय संस्थेचे सस्थापक मंगल मशाखेत्री यांचे गरजु लोकांच्या वतीने आभार मनालेत. दोरीवर ठेवलेले पूर्ण कपडे गरजु लोकांनी मोठ्या आनंदाने नेत असल्याने उपक्रमांचे जनक यांना आपण चालु केलेल्या उपक्रमाचा फायदा गरजु लोकांना होत असल्याने खुप आनंद वाटत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच ज्या कर्मचारी,श्रीमंत लोकांकडे वापरण्यास योग्य असलेले पण वापरात नसलेले वरील वस्तु असतील त्यांनी माणुसकीची दोरी या उपक्रम कसा आहे कळवावे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !