पाथरी येथील वनपाल लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात- १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

पाथरी येथील वनपाल लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात- १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास


सावली : पाथरी वनउपक्षेत्रातील वनपाल वासुदेव लहानुजी कोडापे यांना गुंजेवाही येथील तक्रारदारकडून १ लाख रुपयांची लाच घेताना नागपूर येथील लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून अटक केली आहे.


गुंजेवाही येथील शेतातील सागवानी लाकूड वाहतुकीकरिता तक्रारदाराने वाहतूक परवाना (टीपी) मागितली परंतु पाथरी येथील वनपाल कोडापे यांनी १ लाख २ हजार रुपये लाचेची मागणी केली. १ लाख रुपये देण्याची तडजोड केली परंतु तक्रारदारास न पटल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रार दाखल केली.दिनांक ३ जूनला रात्री शासकीय निवासस्थानी १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली.


सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपयुक्त राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते,पोलीस उपअधीक्षक चंद्रपूरचे अविनाश भामरे यांचे मार्गदर्शनात श्रीमती,शिल्पा भरडे व सहकारी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली व कोणीही लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !