मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर आणि जिल्हा परिषद शाळा च्या वतीने मुल तालुक्यातील विविध गावात प्रवेश दीन साजरा करण्यात आला.

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर आणि जिल्हा परिषद शाळा च्या वतीने मुल तालुक्यातील विविध गावात  प्रवेश दीन साजरा करण्यात आला.


एस.के.24 तास


मुल : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री.प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक कु. निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व मुल येथील शाळा मधील  मूल  तालुक्यात  "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. 



उपक्रमाचे विषेश म्हणजे हा उपक्रम शाळेत शिक्षकांच्या सहकार्यने राबविला जात आहे. 


विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजविणे, माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे व मुलींचे लग्नाचे वय वाढविणे अशा हेतूने मॅजिक बस संस्था चंद्रपूर जिल्ह्यात काम करीत आहे. मुल  येथे 29 जून 2022 ला मॅजिक बस आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचा पहिला दिवस असल्याने गावागावात रॅली,मान्यवरांचे मार्गर्शन, शाळेत नवीन दाखल झालेल्या मुलांचे स्वागत असे कार्यक्रम घेऊन हा शाळेचा पहिला दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. 

तसेच मॅजिक बस चे समुदाय समन्वयक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात गावातील,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक तसेच शाळकरी मुलांनी सक्रिय सहभाग घेतला .सुशी,नलेश्र्वर,सिंथाला,भेजगाव,येरगाव, खालवसपेठ या शाळेत  हा कार्यक्रम  पार पडला.

तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तेथील सीसी संबोधी गेडाम,स्वप्नाजा खोब्रागडे,शोषित खोब्रागडे,प्राची भूर्से,खोजेंद्र उराडे,धनश्री शेंडे आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे SSO संदेश रामटेके यांनी परिश्रम घेतले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !