मजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली संस्थेच्या वतीने तालुक्यातील चार गावात जागतिक योगा दिवस साजरा.

मजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली संस्थेच्या वतीने तालुक्यातील चार गावात जागतिक योगा दिवस साजरा.


एस.के.24 तास


गडचिरोली : मजिक बस संस्थेचे वरिष्ठ  जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री.प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनात व तालुका समन्वय देवेंद्र हिरापुरे सर यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली तालुक्यातील जेप्रा,रजगाटामाल,राजगाटाचक व खरपुंडी येथे जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला. 


दिं. 21/06/2022 ला जागतिक योगा दिवसाचे अवचित्य साधून. तालुक्यातील चार गावामध्ये योगाचे सत्र राबविण्यात आले, योगाच्या सत्रादरम्यान प्रत्यक्ष योगा करून दाखविण्यात आले, प्रत्येक योगाचे विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून देण्यात आले.


हा कार्यक्रम घेण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांना योगा  विषयची आवड निर्माण व्हावी व मुलांना योगा केल्याने काय फायदे होतात. हे लक्ष्यात यावं आणि आजच्या या धावपळीच्या जीवनात जर आपण रोज योगा केला.


आपल्याला शारीरिक,मानसिक व भावनिक खूप फायदा होतो.यामुळे मुलांनी रोज योगा करावा. यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन जीवन कौशल्य शिक्षक, लेखराम हुलके सर तसेच विषय शिक्षिका कु.रिना बांगरे मॅडम यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !