घोसरी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दिव्यांगाना घरकुल द्या - अविंशात अलगमवार
ग्रा.पं.चे ग्राम सचिव व संरपच यानां निवेदन ; भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेची मागणी.
एस.के.24 तास
मुल : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दिव्यांगाना प्रथम प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ द्या अशी मागणी घोसरी ग्राम पंचायतीचे सचिव व संरपच यानां भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेच्या वतीने पोंभुर्णा तालुका सचिव अविंशात अलगमवार यांनी केली.
घोसरी येथे गेल्या दोन महिन्यांपूर्वी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विनकोब्रा सर याच्यां मार्गदर्शनाखाली व प्रयत्नातून दिव्यांगाना राखीव निधी खर्च करण्यास यश मिळाले. प्रधानमंत्री आवास योजना हि सर्वासाठी घरे मिळावे जे कुटुंब बेघर आहेत. ज्याचें कच्चेघर आहेत अशाना घरकुल बाधंकामासाठी अर्थसहाय्य देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने दिव्यांग कुटुंबाना सुद्धा मिळणे गरजेचे आहे. घोसरी गावातील दिव्यांग कुंटूबाना राहण्यासाठी पक्के घरे नाही. कच्च्या, पळक्या घरामध्ये जीवन जगत आहेत. ग्राम पंचायती ला वारंवार निदर्शनास आणून दिले. लक्ष देतांना दिसत नाही. दिव्यांगाना डावलणे म्हणजेच एकप्रकारे अन्यायच आहे. याकडे ग्राम पंचायतीचे सचिव, संरपच व इतर सदस्यांनी लक्ष केंद्रित करून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दिव्यांगाना विना अट प्रथमतः प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ द्या अशी मागणी भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेच्या वतीने पोंभुर्णा तालुका सचिव अविंशात अलगमवार यांनी ग्राम पंचायतीचे सचिव व संरपच यानां निवेदनाद्वारे केली.