संत गजानन महाराज हायस्कूल चा निकाल १०० टक्के प्रणाली नागापुरे विद्यालयतून प्रथम.

संत गजानन महाराज हायस्कूल चा निकाल १०० टक्के  प्रणाली नागापुरे विद्यालयतून प्रथम.


एस.के.24 तास


सावली : ( लोकमत दुधे ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे यामध्ये संत गजानन महाराज हायस्कूल पेंढरी मक्ता चा निकाल १०० टक्के  आहे  शाळेमधून एकूण ४५  विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले असून त्यापैकी प्रावीण्यासह १६,प्रथम श्रेणीत  २४,द्वितीय श्रेणी ५ विद्यार्थी उतिर्ण झालेले आहेत ‌शाळेमधुन कु.प्रणाली वामन नागापुरे ८६ टक्के घेऊन प्रथम ,तर श्रुती दीपक निकेसर ८५.४० टक्के  द्वितीय व प्राजक्ता दयानंद चचाने ८२.२० टक्के  तृतीय आलेली आहे

सर्व  उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सौ सुधाताई के .शेंडे,संसथापक सचिव श्री डॉ.के.ए.शेडे शाळेचे मुख्याध्यापक परशुराम समर्थ व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !