कोरपना पोलिसांना पडला कायद्याचा विसर - सुरज ठाकरे यांचा आरोप.
एस.के.24 तास
कोरपना : दिनांक ०१/०६/२०२२ रोजी कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव रहिवासी श्री संतोष मालेकर यांनी त्यांचे दुचाकी वाहन क्रमांक MH 34 BW 4906 जे गिरसावळे फायनान्स मधून फायनान्स केले होते हे वाहन कंपनी मधून आलेल्या अनोळखी गुंडांनी जबरदस्ती हिसकावून नेले. परंतु त्यावेळी गाडीमध्ये ३०,००० रुपये होते ते देखील गाडी सोबतच घेऊन गेलेत.. याबाबतची लेखी तक्रार पोलीस स्टेशन कोरपना येथे दिली. परंतु कोरपना पोलिसांनी दखलपात्र गुन्हा तात्काळ नोंदविणे आवश्यक असताना देखील प्रकरण थंड बस्त्यात मध्ये ठेवले व दिनांक १२/०६/२०२२ रोजी कोरपना पोलीस स्टेशन मधील राठोड मेजर हे मालेकर यांना गाडी ज्याठिकाणी जप्त करून उभे केलेली आहे त्या ठिकाणी घेऊन गेले व त्यांना गाडी दाखवली व गाडीमध्ये पैसे नाहीत असे सांगितले हे बेकायदेशीर व धक्कादायक काम कोरपना पोलीस कसे काय करू शकते ? असा सवाल सुरज ठाकरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे राठोड मेजर यांना विचारला आहे. त्यावेळी त्यांच्याकडे यासंदर्भात उत्तर नव्हते व भ्रमणध्वनीवर बोलताना त्यांचा आवाज कापत होता. यावरूनच घडलेली घटना व केलेले कृत्य कोरपना पोलिसांनी चुकीचे केले आहे हे सिद्ध होत आहे. खरे पाहता हा विषय अत्यंत गंभीर असून यामध्ये डकेती चा गुन्हा दाखल होणे कायद्याने गरजेचे आहे व तसा गुन्हा २४ तासात दाखल न केल्यास अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक श्री.छेरिंग दोर्जे साहेब यांच्याकडे तक्रार करणार असल्याच सुरज ठाकरे यांनी राठोड मेजर यांना खडसावले आहे. ग्रामीण भागामधील जनतेसोबत अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस हा त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत अन्याय करत आहे असा आरोप ही सुरज ठाकरे यांनी कोरपना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढाकणे यांच्यावर केला आहे.
उल्लेखनीय बाब अशी की दोन दिवस आधीच सुरज ठाकरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे कोरपणा पोलीस स्टेशन अंतर्गत बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यात बाबत तक्रार केली आहे. आणि आता एकेक करून कोरपना पोलीस स्टेशन मधील कच्चा चिट्ठा, विविध प्रकरणे घेऊन अनेक फिर्यादी सुरज ठाकरे यांना संपर्क करीत आहेत यावरूनच कोरपना पोलीस स्टेशन मध्ये ALL IS NOT WELL हे जनसामान्यांच्या लक्षात आले आहे.
सुरज ठाकरे यांनी यावेळी सामान्य जनतेला आवाहन केले आहे की कुणाची देखील काही तक्रार असल्यास त्यांनी देखील संपर्क करावा व निश्चितच त्यांची फिर्याद नोंदविण्यात करता शक्य ते प्रयत्न शक्य त्या स्तरावरील अधिकाऱ्यांकडे जाण्याचे आश्वासन सुरज ठाकरे यांनी दिले आहे.