कर्तबगार उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या क्षेत्रांमध्ये पोलीस निरीक्षकांच्या आशीर्वादाने सुरु आहेत अवैध धंदे. ★ कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी कोरपणा यांची प्रतिमा मलिन होत असल्याचा सुरज ठाकरे यांचा दावा.

कर्तबगार उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या क्षेत्रांमध्ये पोलीस निरीक्षकांच्या आशीर्वादाने सुरु आहेत अवैध धंदे.


★ कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी कोरपणा यांची प्रतिमा मलिन होत असल्याचा सुरज ठाकरे यांचा दावा.


एस.के.24 तास


कोरपना : सविस्तर वृत्त असे की,कोरपना तालुक्यातील धोपटाळा येथे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शेत शिवारात काही सुशिक्षित तरुण अवैधपणे मटका व झेंडी मुंडी खेळत असण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतचं असल्याने विद्यार्थी पालकांना शाळेची फी भरण्याची कारणे सांगून व शिक्षणाकरिता लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू ची कारणे सांगत आई बाबांकडून पैसे घेऊन जात होते परंतु पैसा ज्या कामाकरिता विद्यार्थी न्यायचे तो पैसा त्या कामी उपयोगी न लावता तो पैसा मटका,झेंडी मुंडी व जुगारावरयेथे नेऊन मांडत असल्याने पालकांचा पैशांचा दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी  गावातील चर्चेचा विषय बनला.

गावकऱ्यांनी याआधी देखील सदर प्रकरणा संदर्भात कोरपना पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करून देखील पोलीस प्रशासनाने या प्रकरणा संदर्भात काहीहि पावले उचलले नसल्याने अखेर  गावकऱ्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुरज ठाकरे यांच्याकडे धाव घेत तक्रार केली.त्यानंतर श्री.सुराज ठाकरे यांनी सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील विद्यार्थ्यांचा कल चुकीच्या वळणाकडे जाऊन त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये व मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा दृष्टीकोण समोर ठेवत पोलीस अधीक्षक यांच्याकडे सदर प्रकरणाच्या पुराव्यासहित तक्रार केली.



व चौकशी करून अशाप्रकारच्या अवैध जुगार भरविणाऱ्या /चालविणार्‍या मालकांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नये याकरिता  अवैध मटका व झेंडी मुंडी बंद करण्याकरिता पोलीस अधीक्षक यांना विनंती केली. आता पोलीस विभाग या प्रकरणावर काय कार्यवाही करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !