बेंबाळ येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्याने मेंढ्यांना आंत्रविषार रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास
मुल : उत्कृष्ट नागरी व लष्करी प्रशासक नैतिकतेची आदर्श बिंदू देशव्यापक विचार करत प्रत्यक्ष कृती करणारी एकमेव शासिका पुण्यश्लोक,अहिल्याबाई होळकर यांची 297 व्या जयंती दिनांक 31 मे रोजी बेंबाळ येथे साजरी करण्यात आली.
३१ मे म्हणजे म्हटले की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मोत्सव दिवस.या दिवासानिमित्याने कुरमार समाज बेंबाळ यांच्या वतीने सकाळी मेंढ्यांना आंत्रविषार रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.उपस्थित डॉ.भुसारी सर पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती मूल व टीम होते.
सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावर प्रबोधन कार्यक्रम ठेवण्यात आले होते.त्यामध्ये पुसद येतील बहुजन विचारवंत आणि महाराष्ट्र व भारतभर बहुजन महापुरुषांचे विचार समाजत रुजविनारे व त्यांच्या विचारांचा प्रसार समाजात करनारे, सन २००० पासुन सामाजिक चळवळ कार्यक्रते मुख्य वक्ते आदरणीय डॉ.समीर कदम सर,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.तुषार मर्लावार,धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य विदर्भ अध्यक्ष,प्रमुख अतिथी मा.चंदुभाऊ मारगोनवार माजी सभापती पंचायत समिती मूल,कु. करुणा उराडे सरपंच बेंबाळ.
अतिथी मा.शामराव कंकलवार अध्यक्ष कुरमार समाज बेंबाळ,मा.विनोद वाढई अध्यक्ष,माळी समाज, मा.दिवाकर कडस्कर अध्यक्ष कुणबी समाज,मा.लवसन वाढई अध्यक्ष तंटामुक्त समिति,प्रकाश पंधरे अध्यक्ष,आदिवासी समाज बेंबाळ,मा.प्रवीण वाळके सर प्राचार्य सिद्धार्थ ज्युनियर कॉलेज बेंबाळ,मा.डॉ.दीपक जोगदंडे वैद्यकिय अधिकारी लोंढोली,मा.श्रीकांत शेंडे सामाजिक कार्यकर्ता.जय मल्हार युवा सेना आणि समस्त कुरमार समाज बांधवांनी व बेंबाळ वासियांनी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - आशिष करेवार, प्रास्ताविक - राहुल डंकरवार, आभार प्रदर्शन - मुकेश अल्लीवार यांनी केले. या कार्यक्रमात गावकरी उपस्थित होते.