कांतापेठ येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.
राजेंद्र वाढई - कार्यकारी संपादक एस.के.24 तास
मुल : आज दिनांक,31/05/2022 मंगळवार ला अंदाजे सकाळी 11.00 वा.च्या दरम्यान भुपेंद्र काशिनाथ शेंडे वय,29 छातीच्या आजाराने कंटाळून आत्महत्या केली.मृतकाचे आई घरी कामात असता तिला काही न माहित असता मृतकाने आपल्या राहत्या मधल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
आई काही कामा निमित्ताने खोलीत गेली असता मुलगा गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आला.मग आई आरडाओरडा करत घरा शेजारील लोकांना बोलावून सांगितले.सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन मुल अंतर्गत चिरोली चौकीत माहिती देण्यात आली.घटनास्थळी
चिरोली पोलीस चौकीचे,पोलीस कर्मचारी,अखबर खा पठाण,सुरेश ज्ञानबोनवार,गणेश मेश्राम उपस्थित होते.जावून शव सामान्य रुग्णालय मुल येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले.पुढील तपास पोलीस करीत आहेत.