सेवा सहकारी संस्था मर्यादित नांदगाव च्या निवडणुकीत विनोद अहिरकर व निलेश मगनुरवार गटाचा दारुण पराभव.
दशरथ वाकुडकर व प्रशांत बांबोळे यांच्या ग्राम विकास शेतकरी पॅनलच्या १३ ही सदस्यांचा दणदणीत विजय.
राजेंद्र वाढई !कार्यकारी संपादक!एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील नांदगाव येथे नुकत्याच झालेल्या सेवा सहकारी संस्था नांदगाव रजी.न.९०८ ची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये विनोद अहिरकर काँग्रेस गटाचे व निलेश मगनुरवार भारतीय जनता पार्टीच्या गटाचे यांनी युती करून ही १३ सदस्यसंख्या असलेल्या सोसायटीची निवडणूक अत्यंत चुरशीची केलेली होती. यामध्ये ग्रामविकास पॅनलचे दशरथ वाकुडकर व प्रशांत बांबोळे यांनीही या निवडणुकांमध्ये प्रचंड जोर लावला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनात तसेच नेतृत्वात ग्राम विकास पॅनलच्या १३ सदस्यांचा दणदणीत विजय झाला.
नांदगाव हे गाव राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजल्या जाते. या गावातली कोणतीही निवडणूक असो ती अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची समजली जाते. अशातच सेवा सहकारी संस्था नांदगावच्या निवडणुका आज पार पडल्या. यामध्ये विनोद अहिरकर व निलेश मगनुरवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. ग्रामविकास शेतकरी पॅनलचे दशरथ वाकुडकर व प्रशांत बांबोळे यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या पॅनलचे तेराही सदस्यांना निवडून आणले. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातून प्रकाश यशवंत आंबटकर, प्रभाकर सीताराम अनलवार, प्रशांत सदाशिव बांबोळे, सदाशिव कवडु म्हशाखेत्री, वसंत शंकर मोहुर्ले, नीलकंठ मारोती नरसपुरे, संदीप शंकर रायपल्ले, अशोक ढेकलू उमक महिला राखीव गटातून सुनंदा सुनील काळे, सखुबाई गुड्डी गंपलवार विमुक्त जाती /भटक्या जमाती गटातून गंगाधर कवडु शिंदे अनुसूचित जाती जमाती मधून मंदाबाई भाऊराव लाकडे हे सर्व सदस्य प्रत्यक्ष मतदान पद्धतीद्वारे निवडून आले तर ओबीसी गटामधून त्रिमूर्ती महादेव नाहगमकर हे अविरोध निवडून आले होते. अत्यंत चुरशीच्या लढाईत दशरथ वाकुडकर व प्रशांत बांबोळे यांच्या ग्रामविकास शेतकरी पॅनलने सर्वच्या सर्व सदस्य निवडून आणले त्याबद्दल सर्व सदस्यांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत, राकेशभाऊ रत्नावार, घनश्यामभाऊ येनुरकर व काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.