मुल येथे सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला.
अँड.राजेंद्र महाडोळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,अखिल भारतीय माळी महासंघ यांची उपस्थिती.
एस.के.24 तास
मुल : समाजात आता राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे सत्य शोधक विचारांचा प्रसार गाव खेडया पासून तर शहरा पर्यंत जनमानसात जोर पकडत असल्याचे दिसून येत आहे
दि.7 मे 2022 रोजी ,अखिल भारतीय माळी महासंघाचे तेलंगणा प्रदेश अध्यक्ष, तथा सामाजिक कार्यकर्ता प्रा.सुकूमार पेटकूले आदिलाबाद यांचे चि.कार्तिक व चंद्रपुर(महाराष्ट्र) जिल्ह्यातील नागाळा येथील भैयाजी मोहूरले यांची कन्या ,अंजली यांचा विवाह सत्य शोधक पद्धतीने चंद्रपुर जिल्ह्यातील एस.एम.लाॅन मूल येथें संपन्न झाला.
कार्तिक आणि अंजली यांनी पारंपारिक विचार, कर्मकांड आणि अंधश्रद्धांचा त्याग करत, राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे सत्य वचन स्विकारून, सत्य शोधक पद्धतीने विवाह केला, समाजाला नवा विचार देवून समाजात आदर्श निर्माण केला त्यामूळे, नव दांपत्य व पेटकूले परीवार आणि मोहूरले परीवार यांचे सर्वत्र, दोन्ही राज्यांमध्ये अभिनंदन करण्यात येत आहे.
या प्रसंगी, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, शिवदासजी महाजन,,अॅड. राजेंद्र महाडोळे अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश ,कृष्णाजी महादूरे ,क्षत्रिय, कोसरे माळी समाज, महात्मा फुले शिक्षण संस्था संचालक नागपूर, सुदामजी धाडगे विश्वस्त ओ.बी.सी. महासंघ, पुणे, मधूजी बावलकर वरीष्ठ कवि, साहीत्यीक, आदिलाबाद,केशव दादा इंगळे अध्यक्ष, सिद्ध महायोग पिठ पटणापूर तेलंगणा ,सुर्याजी राव ,ओ.बी.सी.नेते, हैदराबाद ,साबंनाजी शेंडे तेलंगणा प्रदेश सचिव , भगवंतराव कोटरंगे कागजनगर शशांक वाढई, आनंदराव वाढई सामाजिक कार्यकर्ते नांदेड सौ.सुनंदाताई सोनूले महीला आघाडी नागपूर वरील मान्यवरांचे हस्ते, नव दांपत्याना शाल देवून सत्कार करण्यात आला, व राष्ट्रपिता महात्मा फुले आणि राष्ट्रमाता सावित्रीमाई सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमांचे फोटो भेट देण्यात आले.
तर तेलंगू भाषेत,प्राध्यापक सुकूमार पेटकूले लिखीत सत्य शोधक विवाह पद्धतीचे पुस्तक प्रकाशित करून तेलंगणा,व आंध्र प्रदेशात सत्य शोधक विचारांचा प्रचार करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला .विधी कर्ते रघुनाथजी ढोक फुले, शाहू, आंबेडकर एज्युकेशन आणि सोशल फाऊंडेशन, पुणे यांचे हस्ते शोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला .
या सत्य शोधक विवाह प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते त्यात ,अमोल भाऊ गुरूनुले, अध्यक्ष, राजेंद्र भाऊ मांदाळे संघटक अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा यवतमाळ, सत्य शोधक कार्यकर्ते सुनिल भाऊ कावळे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर लोनबले,नंदू बारस्कर
देवरावजी मोहूरले इत्यादी मान्यवर व दोन्ही राज्यांतील समाज बांधव,आप्त, मित्र परीवार हजारो च्या संख्येने उपस्थित होते.