वेकोलीच्या खाणींमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या – युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष, सुरज ठाकरे यांची मागणी. ★ वेकोलिचा सकारात्मक प्रतिसाद - उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक.

वेकोलीच्या खाणींमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या – युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष, सुरज ठाकरे यांची मागणी.


★ वेकोलिचा सकारात्मक प्रतिसाद - उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक.


एस.के.24 तास


राजुरा : राज्यात सर्वत्र बेरोजगारीचे संकट वाढले असताना तसेच राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे स्थानिकांना रोजगार देणे बंधनकारक असतानाही परप्रांतियांना विविध उद्योगांमध्ये पसंती देऊन रोजगार देण्यात येत असुन स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक मात्र नैराश्येच्या गर्तेत जात असून राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या वेकोलीच्या कोळसा खाणींमध्ये कंत्राटी तत्वावर तसेच खाजगी कंत्रादारांकडून नेमण्यात येणाऱ्या कामगार व इतर पदांवर स्थानिक युवकांना प्राधान्याने नोकरी देण्यात यावी अशी जोरदार मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे ह्यांनी आज दि. १७/०५/२०२२ रोजी विकोली उपमहाप्रबंधक वणी क्षेत्र, ह्यांच्या कार्यालयात बेरोजगारांसह जाऊन केली.


राजुरा विधानसभा क्षेत्रांमध्ये गाडेगाव,वीरुर, पोवनी, सास्ती, धोपटाळा, गोवरी, इत्यादी भागांमध्ये सुरू असलेल्या वेकोली अंतर्गत येणाऱ्या खाणींमध्ये कंत्राटी पद्धतीने निर्माण होत असलेल्या रोजगारावर राजुरा विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देऊन सुरज ठाकरे ह्यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.


संबंधित निवेदनावर वेकोलि अधिकाऱ्यांनी सकारात्मक भुमिका घेतली असून येत्या काही दिवसांमध्येच राजुरा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मध्यस्थीने बैठक घेण्याचे निमंत्रण दिले आहे या बैठकीच्या माध्यमातून भागातील सुशिक्षित तरुण बेरोजगारांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहेत तसेच ज्यांना सदर काम येत नाही त्यांना प्रशिक्षण देखील देण्याची तयारी वेकोली ने दर्शविली असल्याने वेकोलिच्या या भूमिकेचे समस्त तरुण बेरोजगारांनी व स्वाभिमान पार्टीचे सुरज ठाकरे यांनी स्वागत केले आहे.


राजुरा विधानसभा क्षेत्रांमध्ये सिमेंट उद्योग व कोळसा खाणींचे जाळे पसरले असताना देखील विधानसभा क्षेत्रातील तरुणांच्या हाती काम नाही व तरुणांना काम मिळावे याकरता जनप्रतिनिधी देखील प्रयत्नशील नाहीत. असा आरोप सुरज ठाकरे यांनी या ठिकाणी केला. परंतु आपण गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये निर्माण होणारा रोजगार हा या भागातील तरुणांना मिळावा यासाठी लढा लढतो आहे. व जोपर्यंत स्थानिक तरुणांच्या हाती रोजगार लागणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !