ग्राहक जागरूकता अभियान.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे) राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली, वाणिज्य विभागाच्या वतीने गुरुवार दिनांक १२ मे २०२२ रोजी 'ग्राहक जागरूकता अभियान' कार्यक्रम सावली ह्या गावामध्ये राबविण्यात आला.सावली ह्या गावातील लोकांमध्ये ग्राहकाच्या मुलभूत अधिकाराविषयी जागृती निर्माण करून त्यांना आपल्या अधिकाराविषयी शिक्षित करने ज्यामुळे त्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही ह्या महत्वपूर्ण उददेशानेच ग्राहक जागरूकता अभियान राबविण्यात आले.हा कार्यक्रम राबविण्याकरिता वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यी उत्साहाने आणि स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या अधिकाराविषयी माहिती दिली आणि ग्राहकांच्या समस्या जावून घेवून त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. ह्या जागरूकता अभियानमध्ये वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.विनोद बडवाईक,प्रा.डॉ. प्रफूल वैराळे, प्रा.विजयसिंग पवार, प्रा.संघानंद बागडे हे उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रमौली सर याच्या मार्गर्शनाखाली घेण्यात आला.ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.