एन.डी.एल.आय उपयोक्ता जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे) राष्ट्रपिता म गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील ग्रंथालय विभाग व आय क्यू ए सी विभागाचे संयुक्त विध्यमाने एन डी एल आय उपयोक्ता जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. आपल्या महाविद्यालयात नुकताच एन डी ए ल आय क्लबचे रजिस्ट्रेशन करण्यात आहे व क्लबच्या माध्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हे भारत सरकारचे मानव संसाधन विकास मंत्रालय आणि उपयोक्ता आय टी खरागपूर यांचे संयुक्त विद्यमाने चालू असलेले न्याशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाने २०१७ मध्ये केंद्रीय मंत्री मान. प्रकाशजी जवाडेकर यांचे हस्ते उदघाटन करून ऑनलाईन स्वरूपात संपूर्ण भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याचे वेब पोर्टलवर संपूर्ण जगातील तसेच भारतातील नामवंत, दर्जेदार व महागडी असे ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथालयाचे माध्यमाने कोणत्याही भारतीय नागरिकास ओपन रजिस्ट्रेशन करून यामध्ये उपलब्ध असलेले ई रिसोर्सेस प्राप्त करता येतात. या वेब पोर्टलवर प्राथमिक शिक्षणापासून तर पी. जी. पर्यंत लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्व शाखांचे ई रिसोर्सेस उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये ई बुक, ऑडीओ, व्हिडीओ लेकचर्स, म्यानुस्क्रिप्ट, पाठयपुस्तके, तसेच स्पर्धा परीक्षांचे सॉल्व्हड पेपर्स, सराव पेपर्स ई. प्रकारचे ऑनलाईन ई रिसोर्सेस उपलब्ध आहेत. तरी कोणत्याही व्यक्तीने एन डी एल आय च्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून याचा लाभ घेऊ शकतो. या कार्यक्रमाप्रसंगी रिसॉर्स पर्सन म्हणून प्रा.संदीप देशमुख यांनी ए न डी ए ल आ य नेमके काय आहे, यामध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे याचे आपल्या शैक्षणिक जीवनात कसे फायद्याचे आहे यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ डी एच उराडे व प्रमुख अतिथी म्हणून डॉ ए टी खोबरागडे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावीक प्रा दिलीप सोनटक्के यांनी केले तर आभार डॉ प्रेरणा मोडक यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी प्रा बागडे व डॉ चौधरी हरिदास चचाने यांनी मोलाचें सहकार्य केले. कार्यक्रमात प्राध्यापक तसेच बहुसंख्य विध्यार्थी उपस्थित होते.