बेंबाळ येथे मा.बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
एस.के.24 तास
मुल : वंचित बहुजन आघाडी नगर शाखा बेंबाळ तसेच भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा व बौद्ध समाज बेंबाळ यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी नगर शाखेच्या अध्यक्षा प्रतिमाताई वाडगुरे, सचिव दिपाली उराडे, श्री. मधुकर उराडे नागभीड - चिमुर तालुका प्रभारी, मधुकर गेडाम तालुका सचिव मुल, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्षा बबीता मेश्राम, सचिव किरणताई वाकळे,कोषाध्यक्षा छब्बूताई उराडे, बौद्ध समाजाचे अध्यक्ष विकास वाळके, सचिव अजय भसारकर,सहसचिव प्रेमानंद उराडे, बेंबाळच्या सरपंचा करुणाताई उराडे, गोकुलदास उराडे, नितीन रामटेके, मदनकुमार उराडे, आनंदराव बांबोळे, सुर्यभान उराडे, मॅनेजर मेश्राम, गुरुदास उराडे, सरोजा बांबोळे, संगिता उराडे, जोगेंद्र उराडे, गायक शेखर देवगडे, शिवाजी उराडे, विनायक उराडे, छकुल वाळके, नत्थू उराडे, भिमसेन मेश्राम,विजय उराडे,नरेश उराडे, विनायक वाकळे, बबलू उराडे, सुमित बांबोळे, तसेच बौध्द उपासक - उपासिका, व गावकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून मा. बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा ६८ वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.