"अंकुर"मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण मूल्यांची रुजवणूक.
एस.के.24 तास
चिमुर : आपल्या भारत देशासारख्या महान राष्ट्रामध्ये सक्षम नागरिक घडावे, यासाठी ब्राईटएज फौंडेशन भिवापूरच्या वतीने भिसी येथे लहान मुलांसाठी अंकुर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती चिमूरचे तालुका संघटक सारंग भिमटे यांनी विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकासह अंधश्रद्धा या विषयावर प्रकाश टाकत विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मूल्य याविषयी सखोल माहिती दिली. यावेळी अंकुर शिबिराचे प्रमुख सूत्रधार विवेक चौखे व व्यवस्थापक विलास चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
दिनांक 15 मे ते 15 जून दरम्यान डॉ. रमेशकुमार गजबे शिक्षा संकुल मातोश्री वृद्धाश्रम पुयारदंड भिसी येथे 11 ते 14 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी अंकुर हे शिबिर सुरू आहे. यात 119 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना नवोदय, सैनिक स्कूल व इतर स्कॉलरशिप परीक्षांची तयारी करून घेण्यात येत आहे. सोबतच लहान मुलांमध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून विविध मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये सर्जनशीलता, तात्विक टीका, रचनाकार, संवाद, उत्सुकता, संवेदनशीलता, सामाजिक भान, अध्यात्मिक व वैज्ञानिक पातळी, बुद्धिमत्ता पातळी, आजीवन शिक्षण, वैश्विक मानवी मूल्ये इत्यादी मूल्यांचा समावेश आहे ही मुल्ये रुजवण्यासाठी विविध खेळ मार्गदर्शन चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. आज अंनिसचे सारंग भिमटे यांनी बुवाबाजी करणाऱ्या लोकांचा भांडाफोड करण्यासाठी विविध प्रकारची प्रात्यक्षिके करून दाखवली. अंधश्रद्धा या विषयावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
आतापर्यंत अंकुरमध्ये परिवर्तनवादी शिक्षक सुधाकर चौके, रवींद्र काळमेघ, नरेंद्र ननावरे, प्रा. राजू केदार, प्रमोद ठोंबरे, सुभाष नन्नवरे, चंद्रशेखर ननावरे, चंद्रशेखर सावसाकडे, संदीप चौधरी, राहुल जांभुळे, रोशन धारणे, अंकुश वाघमारे, निखिल राणे, आकाश बारेकर, जगन्नाथ ननावरे, अपेक्षा कोठे, विरुरकर मॅडम, विशाल ढोक, प्रा. बंडू चौधरी यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
अंकुर शिबिराचे यशस्वी आयोजन व्हावे, यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी निवासी राहून सेवा दिली.यामध्ये प्रफुल्ल भरडे, प्रदीप चौधरी,भूषण श्रीरामे,संदीप धारने,अमोल चौधरी,रणजित सावसाकडे,नंदू जांभुळे, भाऊराव घरत, रोशन जांभुळे, नितेश श्रीरामे, रितू श्रीरामे, सीमा चौके, माधुरी चौधरी, नयना चौधरी,रितेश गजभे, रोशन चौधरी, प्रणय रंदये ,करण सावसाकडे,अंकित ननावरे यांचा समावेश आहे. या सर्वांचे प्रमुख मार्गदर्शक माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे यांनी आभार मानले.