तालुक्यातील बारा गांवात मनरेगाचे तर एकेवीस गांवात पाणंद रस्ते होणार.
★ मुल तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने ना.वडेट्टीवार यांचे आभार.
एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील जनतेची मागणी आणि मार्गाची अडचण लक्षात घेवुन जिल्ह्याचे पालकमंञी ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी तालुक्यातील कोसंबी,फिस्कुटी,चिचाळा, बाबराळा,दाबगांव,आगडी,सुशी,राजोली, चितेगांव,नवेगांव,डोंगरगांवा आणि चिखली या बारा गांवात मनरेगा योजने अंतर्गत प्रत्येकी ३० लाख रूपये याप्रमाणे एकुण ३६० लाख रूपये खर्चुन पेव्हर ब्लाँक सिमेंट रस्ता बांधकामास परवानगी दिली असुन मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत मूल तालुक्यातील चांदापूर,राजोली,नांदगांव,विरई,भवराळा,बोंडाळा बुजरूक,बोंडाळा खुर्द,बाबराळा,पिपरी दिक्षित, नवेगांव भुजला,जुनासुर्ला,गोवर्धन,गडीसुर्ला, उथळपेठ,टेकाडी,मरेगांव,जानाळा,केळझर, नलेश्वर,भेजगांव आणि चकदुगाळा या गांवातील जनतेला होत असलेली अडचण दुर व्हावी म्हणुन तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे कडे सातत्याने पाठपुरावा केला.केलेला पाठपुरावा आणि अडचण लक्षात घेवुन ना,विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सन २०२२-२३ या वित्त वर्षात पाणंद रस्ते निर्माण करण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली आहे. मनरेगा अंतर्गत गांवातील अंतर्गत आणि पाणंद योजने अंतर्गत गांवाबाहेरील रस्ते निर्मीतीसाठी पालकमंञी ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मूल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने तालुक्याचे ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक संतोषसिंह रावत, तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, जिल्हा महासचिवा राकेश रत्नावार, शहराध्यक्ष सुनिल शेरकी, महीला अध्यक्ष रूपाली संतोषवार, किसान सेलचे रूमदेव गोहणे,ओबीसी सेलचे राजेंद्र वाढई,संदीप कारमवार,अखील गांगरेड्डीवार, राजेंद्र कन्नमावार,तालुकाध्यक्ष पवन निलमवार, आदींनी ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे आभार मानले आहे.