मुल शहरात लावण्यात आलेले पाण्याचे फवारे तात्काळ सुरू करा - माजी नगरसेवक,विनोद कामडी यांची मागणी.

मुल शहरात लावण्यात आलेले पाण्याचे फवारे तात्काळ सुरू करा - माजी नगरसेवक,विनोद कामडी यांची मागणी.


एस.के.24 तास


मुल : शहरात शहराचे सुशोभिकरण करण्याकरिता शहरातील सर्व प्रभागातील चौकाचौकांमध्ये पाण्याचे फवारे तयार करण्यात आले शहरातील जनतेला रात्रीचे वेळी फिरत असताना विशेष आकर्षण वाटावे पाण्याचे फवारे लावण्यात आले. मात्र हें पाण्याचे फवारे बंद अनेक दिवसांपासून बंद स्थितीत आहेत. बंद असलेले पाण्याचे फवारे तात्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी मूल नगर परिषदेचे माजी नगरसेवक यांनी केली आहे. शहरात एकूण 17 वार्ड आहेत. प्रत्येकी अंदाजे दोन लाख रुपये प्रमाणे 34 लाखांचा खर्च नगरपरिषदेने या कामाकरिता केला आहे. मात्र त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. हें सुशोभीकरण दिखावा करण्याकरिता करण्यात आला का? असा प्रश्न विनोद कामडी यांनी उपस्थित केला आहे.

विषयाकडे प्रशासन दुर्लक्ष केले आहे. नाव लवकिक करण्याकरिता सुशोभीकरणावर खर्च करुन जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली असल्याचा आरोप कामडी यांनी केला आहे.शहरातील एकूण 17 वार्डातील लावण्यात आलेले पाण्याचे फवारे  सुरु करण्यात यावे, अन्यथा प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल असा इशारा मूलचे उपविभागीय अधिकारी खेडकर यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. निवेदन देताना काँग्रेसचे सुरेश फुलझेले,चंद्रकांत चटारे,आसिफ पठाण,आशिष रामटेके, संदीप मोहबे,अतुल गोवर्धन, गिरीधर गाजेवार,दिवाकर वाढई आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !