छत्रपती संभाजी शेतकरी सेवा संघटनेच्या विदर्भ जनसंपर्क प्रमुखपदी मा.करण लुटे

छत्रपती संभाजी शेतकरी सेवा संघटनेच्या  विदर्भ जनसंपर्क प्रमुखपदी मा.करण लुटे


नरेंद्र मेश्राम !जिल्हा प्रतिनिधी!भंडारा!एस.के.24 तास


भंडारा : छत्रपती संभाजी शेतकरी सेवा संघटनेच्या  विदर्भ जनसंपर्क प्रमुखपदी मा.करण लुटे यांची नियुक्ती करण्यात आली.त्यावेळी छत्रपती संभाजी शेतकरी सेवा संघटनेचे संस्थापक किशोरजी मोहतुरे यांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.तर या पदावर माझी नियुक्ती करून मला समाजकार्य करण्याची एक संधी या संघटनेच्या माध्यमातून मिळत आहे आणि जिल्हा जनसंपर्क प्रमुख  महेश शिवणकर  व संपूर्ण संघटनेचे पदाधिकारी ह्यांचे प्रेरणेने एक जिम्मेदारी चे पद  कर्तबगारीने पार पाडण्याची जिम्मेदारी मला देण्यात आली आहे. मी सुद्धा एका शेतकरी बापाचा मुलगा असून माझ्या शेतकरी बांधवांच्या सर्व समस्या आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्व छत्रपती संभाजी शेतकरी संघटनेतर्फे लढा द्यायला कधीही तत्पर राहू.असे मत विदर्भ जनसंपर्क प्रमुख मा.करण लुटे यांनी व्यक्त केले आहे.

             आमचा भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.आणि जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी राज्याचीच आज दैनीय अवस्था पाहायला मिळत आहे.आज महागाई पासून तर खतांच्या किंमती,मजूर वर्ग,ट्रॅक्टर नांगरणी या सर्वांचे दर वाढले तरी सुद्धा आमच्या शेतातील पिकांचाच भाव का वाढत नाही हा सुद्धा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर काही ग्रामीण भागामध्ये ज्या गावालगत जंगले आहेत अश्या ठिकाणी वन्यप्राण्यांपासून शेतातील शेतपिकांची नुकसान होत आहे त्यामुळे सुद्धा शेतकरी आज हताश झाला आहे.याकडे शासन आणि वनविभागाने सुद्धा या गोष्टींची दखल घेत वन्यप्राण्यांच्या संरक्षणाकरिता जंगलाच्या सभोवताल कायमस्वरूपी काटेरी कुंपणाची व्यवस्था करावी.कारण जंगल भागामध्ये आपल्या शेतपिकांची नुकसान होऊ नये म्हणून रात्रअहोरात्र त्या शेतात आपल्या पिकांची राखणदारी करणारा शेतकरी सकाळी उठून घरी सुखरूपपने परत येईल याची काही शाश्वती नाही.याकडे शासनाने लक्ष द्यावे असे मत विदर्भ जनसंपर्क प्रमुख मा. करण लुटे यांनी व्यक्त केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !