व्याहाड खुर्द येथे आदिवासी सामाजिक प्रबोधन मेळावा व सत्कार सोहळा संपन्न. ★ शेकडो आदिवासी बांधवांची उपस्थिती. ★ जल जंगल जमीनचा मूळ मालक आदिवासी मात्र विस्थापित झाला.- वडेट्टीवार

व्याहाड खुर्द येथे  आदिवासी सामाजिक प्रबोधन मेळावा व सत्कार सोहळा संपन्न.

 

★ शेकडो  आदिवासी बांधवांची उपस्थिती.


★ जल जंगल जमीनचा मूळ मालक आदिवासी मात्र विस्थापित झाला.- वडेट्टीवार


एस.के.24 तास


सावली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र राज्य अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली शाखा अंतर्गत व्याहाड खुर्द येथील देवराव मंगल कार्यालय येथे भव्य दिव्य असा आदिवासी सामाजिक प्रबोधन मेळावा व सत्कार सोहळा संपन्न झाला.


 कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णारावजी परतेकी माजी महापौर नागपूर.

 कार्यक्रमाचे उद्घाटक मदत व पुनर्वसन मंत्री माननीय श्री विजय भाऊ वडेट्टीवार. सत्कार मूर्ती नवनियुक्त महाराष्ट्र शाखा अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद माननीय राम साहेब चव्हाण. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रीय युवा अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद श्री जितेंद्र मोघे. प्रधान सभा राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश मडावी. जेष्ठ आदिवासी साहित्यिक श्री एडवोकेट एल के मडावी. जेष्ठ आदिवासी साहित्यिक प्रभू राजगडकर. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद दिनेश शेराम.  स्वागत अध्यक्ष आदिवासी सेवक विदर्भ सचिव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद केशवजी तिराणिक.  महिपाल मडावी.कवी कुसुम आलाम.बी.डी.ओ.सुनीताताई मरस्‍कोले.रुपाली कन्नाके लोकशाहीर _बाबुराव जुमनाके. रामचंद्र आत्राम आदी उपस्थित होते.


 आदिवासी सामाजिक प्रबोधन_ मेळावा व सत्कार सोहळ्याला प्रबोधन करताना  विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आदिवासी शक्ती व संघटन पाहून अचंबित झालो यापुढे आदिवासीचे कोणतेही समस्या सोडवल्या शिवाय राहणार नाही. मला निवडून देण्याकरिता आदिवासी समाजा चा मोठा वाटा राहिलेला आहे. जगातील पहिला कोण असेल तर जल जंगल जमिनीचा मालक आदिवासी आहे मात्र आदिवासी समाज व या मूळ मालकाला विस्थापित करण्याचा षडयंत्र सुरुवात असून भविष्यात या समाजाचा आरक्षण धोक्यात आहे त्यामुळे समाजानी  एक संघटित होऊन लढा लढण्याची गरज आहे. ज्या गावातील लोकसंख्या दोनशेच्यावर असेल त्यात्या  गावात  गोटूल सभागृहनिर्माण करून त्यात सभागृहांमध्ये आदिवासीb मुलांना वाचनालयाची सोय होईल याकरिता मी पूर्ण प्रयत्न करेल असे संबोधित करून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चि प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या..

  आदिवासी वर होणारे अन्याय अत्याचार व न्यायअधिकारासाठी आपली संघटना संपूर्ण देशात काम करेल असे आश्वासन जितेंद्र मोघे राष्ट्रीय युवा अध्यक्ष यांनी मार्गदर्शन मधून  दिल.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव तिराणिक विदर्भ सचिव यांनी आपल्या प्रास्ताविक  भाषण मधून आदिवासी समाजाच्या शैक्षणिक राजकीय भौगोलिक मागण्या व न्याय अधिकारा संदर्भात  बोलले. या प्रबोधन सोहळ्यात विविध विषयावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम प्रसंगी आदिवासी रेला नृत्य व वेष भू शा. आदिवासी गीत गायन सुद्धा घेण्यात आले 

या आदिवासी सामाजिक प्रबोधन मेळावा व सत्कार कार्यक्रमाचे मुख्य संयोजक युवक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे. सावली तालुका अध्यक्ष प्रविण गेडाम. विदर्भ युवक संघटक कृणाल तिरानिक आणि गुरदास कन्नाके. पुरुषोत्तम कन्नाके. उत्तम गेडाम. राकेश कन्नाके थामदेव शेडमाके. राजु कोडापे. वासुदेव कोडापे. राकेश परचाके नश्वर गेडाम यांनी सहकार्य व सावली तालुक्यातील समाज बांधव सुद्धा सहकार्य केला.

सूत्रसंचालन बाबुराव जुमनाके रामचंद्र आत्राम तर आभार प्रविण गेडाम सावली तालुका अध्यक्ष यांनी केला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !