तलावाचे खोदकाम करताना सापडले दुर्मीळ शिल्प,भेजगाव परिसरात चर्चेला उधान.



तलावाचे खोदकाम करताना सापडले दुर्मीळ शिल्प, भेजगाव परिसरात चर्चेला उधान.


राजेंद्र वाढई ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास


मुल : तालुक्यातील भेजगाव येथील मामा तलावाचे खोलीकरण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू आहे. तलावातील खोली करणाच्या कामामध्ये आतापर्यंत प्राचीन काळातील अनेक मुर्त्या, शिल्पे मजुरांना मिळत आहेत. मागील चार पाच दिवसापुर्वी एक मूर्ती मिळाली होती. ती नेमकी कोणाची. अग्निदेवाची की यमाची? यासाठी इतिहास अभ्यासकात द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर ते अग्निदेवतेची मूर्ती आहे हे अनेक अभ्यासकांनी सिद्ध झाले. 

     त्याच तलावात खोदकाम करताना आणखी पुन्हा अत्यंत दुर्मिळ शिल्प आढळून  आल्यामुळे गावकरी आश्चर्यचकित झाले आहेत. नेमके हे शिल्प कशाचे? अशी चर्चा परिसरात रंगली आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिक विकास गांगरेडीवार यांनी गोंडपिपरी येथील इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे शिल्प पंचमुखी शिवलिंगाचे असल्याचे सांगितले. या शिल्पाची माहिती मिळताच गावचे सरपंच अखिल गांगरेड्डीवार,प्रतिष्ठित नागरीक प्रकाश पाटील गांगरेड्डीवार,धनराज गांगरेड्डीवार,विलास सोनुले, सचीन गांगरेड्डीवार, तानाजी  गांगरेड्डीवार,किशोर गांगरेड्डीवार, व,मंसुकलाल गणवीर,बाळू वाढई,विक्रांत गांगरेड्डीवार त्याच प्रमाणे काही गावकरी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ते शिल्प शिवमंदीरात सुरक्षित स्थळी ठेवले आहे.


प्रतिक्रिया : पंचमुखी शिवलिंग हे अत्यंत दुर्मिळ शिल्प असून विदर्भात त्याचे दर्शन दुर्लभ झाले आहेत. शिवाला दहा हात असलेले पंचमुखी मानले जाते. शिवाचे पश्चिम मुख हे पृथ्वी तत्व म्हणून पूजले जाते.  त्याचे उत्तर मुख हे जल तत्व, दक्षिण मुख हे तेजस तत्व आणि पूर्व मुख हे वायु तत्व म्हणून पूजले जाते.भगवान  शिवाचे वरचे मुख हे आकाश तत्व म्हणून पूजले जाते.

- अरुण झगडकर इतिहास अभ्यासक,        गोंडपिपरी - 9405266915


Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !