प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दिव्यांगाना प्राधान्याने लाभ द्यावे - भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेची मागणी.
एस.के.24 तास
पोंभुर्णा : भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना शाखा पोंभुर्णा तर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दिव्यांगाना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजना हि सर्वासाठी घरे मिळावे जे कुटुंब बेघर आहेत. ज्याचें कच्चेघर आहेत अशाना घरकुल बाधंकामासाठी अर्थसहाय्य देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने दिव्यांग कुटुंबाना सुद्धा मिळणे गरजेचे आहे.बरेच दिव्यांग आहेत ज्यांना राहण्यासाठी पक्के घरे नाही.कच्च्या,पळक्या घरामध्ये जीवन जगत आहेत. शासनाकडे वारंवार मागणी करूनही ग्राम पंचायत,नगरपालिका स्तरावर प्रशासन लक्ष देतांना दिसत नाही.
दिव्यांगाना डावलणे म्हणजेच एकप्रकारे अन्यायच आहे. याकडे शासनाने लक्ष केंद्रित करून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दिव्यांगाना विना अट प्रथमतः प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेच्या वतीने पोंभुर्णा तालुका अध्यक्ष,रफिक शेख,तालुका सचिव,अविंशात अलगमवार यांनी जिल्हाधिकारी साहेब यानां निवेदनाद्वारे केली.
यावेळी राजू पारडे,फिरोज पठाण,तालुका सहसचिव गयाबाई भलवे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.