मुल येथे गळफास घेवुन युवकाची आत्महत्या.
एस.के.24 तास
मुल : येथील क्वॉलिटी इलेक्ट्रीकचे मालक नरेश बोमनवार यांचे लहान बंधु अमोल बोमनवार यांनी स्वतःच्या राहत्या घरी सिलींग फॅनला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 3. वाजता दरम्यान उघडकीस आली.
मूल तालुक्यातील टेकाडी येथील अमोल बोमनवार हे व्यवसायाच्या निमीत्याने मूल येथे राहात होते, त्यांचा मूल येथील नागपूर मार्गावर रिवायडींगचा व्यवसाय होता, आज दुपारच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप कळु शकले नाही मात्र त्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी मावशीला फोन केल्याची चर्चा आहे.
पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.